Friendship Day 2019: प्रत्येकाकडे असलेच पाहिजेत असे मित्र, तुमच्याकडे आहेत का?

Friendship Day 2019: जगभरात मैत्रीचं नातं हे इतर कोणत्याही नात्यापेक्षा वरचढ असतं. नातेवाईक निवडणं आपल्या हातात नसलं तरी मित्र- मैत्रिणी निवडणं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं.

  • Share this:

Friendship Day 2019, फ्रेंडशिप डेः जगभरात मैत्रीचं नातं हे इतर कोणत्याही नात्यापेक्षा वरचढ असतं. नातेवाईक निवडणं आपल्या हातात नसलं तरी मित्र- मैत्रिणी निवडणं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. असे मित्र जे आपल्या सुख, दुःखात साथ देतात. पहिल्या प्रेमापासून ते नोकरीतील राड्यापर्यंत साऱ्या गोष्टी आपण शेअर करतो. आज आम्ही तुम्हाला अशा 10 मित्रांच्या सवयींबद्दल सांगणार आहोत जे प्रत्येक ग्रुपमध्ये दिसतीलच.

उधार घेणारे मित्र- हे मित्र प्रत्येक ग्रुपमध्ये असतातच. उधार घेतलेले पैसे परत कधीही न देणाऱ्या मैत्रींची तर फौज प्रत्येक ग्रुपमध्ये असते. त्यांच्याकडून पैसे परत मिळवणं हे फार कठीण काम असतं.

आंघोळ न करणारे- उन्हाळा असो वा हिवाळा काही मित्र हे आंघोळ करायला नेहमीच टाळाटाळ करतात. याबद्दल त्यांना विचारलं तर म्हणतात, ‘अरे यार कालच तर आंघोळ केली होती.’

नेहमीच दुःखी राहाणारा मित्र- काही मित्रांचे मूड हे नेहमीच ऑफ असतात. दिवस कोणताही असो ते कधीच आनंदी दिसत नाहीत.

ऑनलाइनवाली मैत्री- ही मैत्री थोडी वेगळी असते. दिवसभरात किमान 10 मीममध्ये मित्र टॅग करून एकमेकांची खिल्ली उडवत असतात.

डबल मिनिंगवाला मित्र- गप्पा कोणत्याही असो पण त्याचा अर्थ नेहमी वेगळ्या पद्धतीने घेणारे मित्र प्रत्येक ग्रुपमध्ये असतात.

नेहमी उशीरा येणारा मित्र- फक्त ५ मिनिटांत पोहोचतो असं सांगून किमान एक तास उशिरा येणारा मित्र प्रत्येक ग्रुपमध्ये असतोच.

सुस्त मित्र- नियमित जिमला जाण्याचा विचार अनेकांचा असतो. काहीजण एकाच जिमला नाव नोंदवतात जेणेकरून एकमेकांसोबत ते जिमला नियमित जातील. पण यातही काही मित्र असे असतात जे आज नको उद्यापासून नक्की येईन असा डायलॉग मारतात.

आज गाडी तुझा भाऊ चालवणार- पार्टी केल्यानंतर प्रत्येकालाच गाडी चालवायची हुक्की येते. त्यात मैत्री आणि ड्रायव्हिंग हे एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे. त्यातही जर मित्राने थोडी दारू प्यायली असेल तर गाडी चालवण्याचा हट्ट नेहमी तो करताना दिसेल.

Hmm वाला मित्र- मित्र- मैत्रिणींचे चॅट नेहमीच मजेशीर असतात. पण यातही काही मित्र समोरून कितीही चांगला मेसेज असला तरी त्यावर Hmmm असंच उत्तर देतो.

तू माझा भाऊ आहेस- नातं जरी मित्रत्वाचं असलं तरी भावापेक्षा ते नातं कमी नसतं. काही मित्र सतत तू माझा भाऊ आहेस असा डायलॉग मारत सतत मिठी मारत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 12:40 PM IST

ताज्या बातम्या