S M L

Happy Birthday Sachin Tendulkar : क्रिकेटच्या देवाचं हे अनोखं 'प्रेम' तुम्ही आतापर्यंत पाहिलं नसेल

सचिनच्या खेळाबरोबरच त्याच्याबद्दल लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे त्याचं कार प्रेम. सचिनच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त सचिनच्या खजिन्यात असणाऱ्या एक से एक भारी गाड्यांचा नजारा आणि त्याविषयीच्या गोष्टी.

Updated On: Apr 24, 2019 06:29 PM IST

Happy Birthday Sachin Tendulkar : क्रिकेटच्या देवाचं हे अनोखं 'प्रेम' तुम्ही आतापर्यंत पाहिलं नसेल

मुंबई, 24 एप्रिल : सचिन तेंडुलकर त्याच्या धावांच्या विक्रमांनी लक्षात राहतो, त्याच्या बॅटिंगच्या स्टाईलमुळे भावतो, त्या काळी भारताच्या फलंदाजीची सारी मदार या खेळाडूवर असायची आणि एकहाती सामना फिरवायची ताकद या जागतिक कीर्तीच्या फलंदाजात होती. सचिनच्या खेळाबरोबरच त्याच्याबद्दल लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे त्याचं गाड्यांचं वेड. सचिनच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त सचिनच्या खजिन्यात असणाऱ्या एक से एक भारी गाड्यांचा नजारा....

1. Ferrari 360 Modena

Ferrari 360 Modena (फोटो सौजन्य : Team-BHP)

Ferrari 360 Modena (फोटो सौजन्य : Team-BHP)



फेरारी 360 मॉडेना ही खरोखर प्रत्येकाची ड्रीम कार असू शकते. त्यातून सचिनला ही गाडी मिळालेय वेगाचा बादशहा - फॉर्म्युला 1 चा चँपियन  मायकेल शुमारक याच्याकडून. डॉन ब्रॅडमनच्या 29 कसोटी शतकांची सचिनने बरोबरी केली तेव्हा 2000 साली शुमाकरने ही भन्नाट गाडी त्याला भेट दिली होती. काही वर्ष ती सचिनच्या ताफ्यात होती. मग त्याने सुरतच्या एका व्यापाऱ्याला विकली.

2. Nissan GT-R

Loading...

Nissan GT-R (फोटो सौजन्य : Clinton Pereira Photography)

Nissan GT-R (फोटो सौजन्य : Clinton Pereira Photography)


निस्सान जीटी -आर ही गाडी सचिनचा एके काळी जीव की प्राण होती. ही निस्सानची लक्झरी कार आहे, हे तुम्हाला माहिती असेल, पण कंपनीने खास सचिनसाठी या आलिशान गाडीत आणखी काही आरामदायी बदल करून मेड टू ऑर्डर लक्झरी कार तयार करून दिली होती. बराच काळ या गाडीची मजा लुटल्यानंतर सचिनने 2017 मध्ये ही गाडी विकली.

3. BMW X5M

BMW X5M SUV (फोटो सौजन्य : Acierto Multi Trade Pvt Ltd)

BMW X5M SUV (फोटो सौजन्य : Acierto Multi Trade Pvt Ltd)


बीएमडब्लू सुद्धा सचिनची आवडती गाडी आहे. बीएमडब्ल्यू X5M ही निळ्याशार रंगाची गाडी सचिनकडे होती. M कॅटेगरीतल्या SUV गाड्या त्या वेळी भारतात अगदीच दुर्मीळ होत्या. सचिन ही गाडी नेहमी वापरायचा. आपल्या ताफ्यातली सगळ्यात जास्त त्याने हीच गाडी पळवली असेल.  गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निव्वळ 21 लाखांना सचिनने ही आलिशान स्टायलिश गाडी विकली.

4. BMW i8

modified BMW i8. (फोटो सौजन्य : Darshan Shinde Photography)

modified BMW i8. (फोटो सौजन्य : Darshan Shinde Photography)


बीएमडब्ल्यू आय8 ही खरं तर स्पोर्ट्स कार. सचिनसाठी ही गाडी खास कस्टमाईज्ड करण्यात आली होती. सचिन स्वतः 2012 पासून BMW चा ब्रँड अँबॅसेडर आहे. या मॉडिफाईड गाडीचा रंगसुद्धा खास सचिनला हवा म्हणू लाल आणि पांढरा रंगवण्यात आला होता.

5. Maruti 800


मारुती800 या गाडीला विसरून कसं चालेल. ही गाडी आपल्यापैकी अनेकांकडे असेल, किंवा घेण्याचा विचार केला असेल. त्या वेळी भारताच्या नवमध्यमवर्गाकडे हीच गाडी घेण्याएवढं स्वप्न असायचं. सचिनने स्वतः खरेदी केलेली ही अर्थातच पहिली गाडी. 1983 मध्येच सचिनला ही गाडी घ्यायची होती. त्या वेळी भारतात मारुती 800 नुकतीच लाँच झाली होती. पण प्रत्यक्षात सचिनला ती घेता आली 1989 साली. अगदी नुकतंच मारुती सुझुकीने या गाडीचे अपडेटेड व्हर्जन लाँच केलं आहे Alto 800.


ModiWithAkshay राजकारणापलीकडचे नरेंद्र दामोदरदास मोदी पाहा UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 06:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close