VIDEO: पंतप्रधान मोदींच्या या 7 फेवरेट आसनांनी फिटनेस आहे 'मुमकिन'

मोदी फक्त स्वतःच फिट राहतात असं नाही तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर मंत्र्यांनाही ते फिट राहण्याचा आणि नियमितपणे योगासनं करण्याचा सल्ला देतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2019 10:27 PM IST

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या या 7 फेवरेट आसनांनी फिटनेस आहे 'मुमकिन'

मुंबई, 16 सप्टेंबर- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या त्यांचा 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. (Prime Minister Narendra Modi's 69th birthday) एवढ्या वयातही मोदी दिवसाचे 18 ते 20 तास काम करतात. यावरूनच ते किती फिट आहेत याचा अंदाज बांधता येऊ शकतो. मोदी जेवढं त्यांच्या आहाराकडे लक्ष देतात तेवढ्याच नियमितपणे ते योगसनं आणि ध्यानसाधना करतात. त्यांच्या याच सवयीमुळे ते वयाच्या 69 व्या वर्षीही सुदृढ आणि फिट आहेत. ते फक्त स्वतःच फिट राहतात असं नाही तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर मंत्र्यांनाही ते फिट राहण्याचा आणि नियमितपणे योगासनं करण्याचा सल्ला देतात.

यासोबतच ते आंतरराष्ट्रीय योग दिवस, खेलो इंडिया, फिट इंडिया मूवमेंट अशा अनेक कार्यक्रमांमध्ये नरेंद्र मोदी यांनी फिट राहणं किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं. यासोबतच भारतीय तरुणांना जास्तीत जास्त शारीरिकरित्या तंदुरुस्त राहण्याचा सल्ला दिला. याशिवाय ते अनेकदा योगासनं आणि मानवी शरीराला त्याचं असणारं महत्त्व सांगणारे ट्वीट करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सात योगासनं आणि त्यांचं महत्त्व सांगणारे व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले होते.

त्रिकोसणासन- या आसनामुळे पाठीचे स्नायूंसोबतच मांड्या, खांदे, छाती आणि कणा मजबूत होतो. ज्यांना पाठदुखी किंवा मानदुखी तसेच स्लिप डिस्कचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. या आसनामुळे मानसिक ताणही कमी होतो.

वृक्षासन- या आसनामुळे शरीराचं संतुलन सुधारण्यात मदत होते. याशिवाय पाय, मांड्या, पाठीचा कणा, खांदे, हात मजबूत होतात. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजेएकाग्रतेसाठी हे आसन फार उपयोगी आहे. मात्र ज्यांना उच्च रक्तदाबाचा, मायग्रेनचा आणि वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये.

शशांकसन- ज्यांना अती राग येतो तसेच जे तणावग्रस्त आहेत त्यांनी हे आसन नक्की करावं. नियमित हे आसन केलं तर बद्धकोष्ठता, अपचन, पाठदुखी यांसारखे आजार दूर होतात. मात्र ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये.

शलभासन- ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे आणि ज्यांना मांडीवरील फॅट कमी करायचे आहेत त्यांनी हे आसन नक्की करावं. यामुळे शरीराला एक कमनीय आकार येतो. तसेट पोटासाठी हे योगासन फार फायदेशीर आहे. गरोदर महिला, हर्निया, हृदयविकार आणि हायपर टेन्शनच्या रुग्णांनी हे आसन करू नये.

सूर्यनमस्कार- या एका आसनात अनेक आसनांचे फायदे आहेत. नियमितपणे हे आसन केल्यास फुफ्फुसांची क्षमता तर वाढतेच शिवाय मधुमेहावरही नियंत्रण मिळवण्यास मदत होते. तसेच स्नायू बळकट होतात. ज्यांना हायपर टेन्शन, हर्निया, स्पॉण्डिलायसीस आणि आर्थ्रायटिस आहे त्यांनी हे आसन करू नये.

भूजंगासन- यामुळे पोटाची चरबी कमी होते. याशिवाय पाठदुखी, बद्धकोष्ठतासारखे आजार दूर होतात. याशिवाय श्वसनाची क्रियाही सुधारते. मात्र ज्यांना हर्नियाचा त्रास आहे तसेच ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी हे आसन करू नये.

पवनमुक्तासन- या आसनामुळे पचनक्रिया सुधारते तसेच बद्धकोष्ठतेचे आजार दूर होतात. पाठीच्या स्नायूंसाठी हे आसन फायदेशीर आहे. मात्र ज्यांना पोटदुखी, पाठदुखीस हर्निया आहे त्यांनी हे आसन करू नये.

कपालभातिचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

या एका योगासनात आहे अनेक आजार नष्ट करण्याची ताकद

पोटाची चरबी कमी करायची आहे? नाश्त्यात हे पदार्थ नक्की खा!

आपल्या आईपासून या 5 गोष्टी कधीही लपवू नका, नंतर होईल पश्चाताप!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 10:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...