Home /News /lifestyle /

60 देश, एक लाख लोक, एकत्र ऑनलाइन पठण; कोरोना काळात 'हनुमान चालिसा'चा वर्ल्ड रेकॉर्ड

60 देश, एक लाख लोक, एकत्र ऑनलाइन पठण; कोरोना काळात 'हनुमान चालिसा'चा वर्ल्ड रेकॉर्ड

जगातील लाखो लोकांनी एकत्र येत एकाच वेळी ऑनलाइन हनुमान चालिसा पठण केलं आहे.

    प्रयागराज, 18 ऑगस्ट : कोरोना (coronvirus) काळात लोक अनेक वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसत आहेत. एकत्र हनुमान चालिसा पठण करणं तसं काही नवीन नाही. मात्र आता हनुमान चालिसा पठणाचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. 60 देशांतल्या एक लाख लोकांनी एकाच वेळी एकत्र ऑनलाइन हनुमान चालिसा पठण केलं आहे. कोरोना महासाथीचा लवकर नाश व्हावा आणि लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी हे हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. जगातील  एकत्र येत एकाच स्वरात सुंदरकांड आणि हनुमान चालिसा पठण केलं आहे. प्रयागराजमधील लेटे हनुमान मंदिरातील महंत योगगुरू आनंद गिरी यांनी सांगतिलं, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सिलकॉन आंध्रा या संस्थेने हनुमान चालिसाचं ऑनलाइन पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. झूम अॅपमार्फत वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आले. जगातील 60 देशांतील एक लाख लोकांना जोडण्यात आलं. प्रयागराजहून स्वामी आनंद गिरीदेखील यामध्ये सहभागी होते. 15 ऑगस्ट रात्री साडेवाढ वाजता पठण सुरू झालें ते रात्री साडेबार वाजेपर्यंत सुरू होतं. हे वाचा - चक्क 2 महिने त्याने Air Fryer मध्ये ठेवली सोन्याची चैन: कारण वाचून हेवा वाटेल या अनोख्या हनुमान चालिसा पठणाने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. गिनीज बुकचे अधिकारी फिलिप्स यांनी आपल्या टीमसह हे हनुमान चालिसा पठण पूर्ण पाहिलं आणि त्यांनी या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभागी करून घेतलं आणि प्रमाणपत्र दिलं. हे वाचा - होय हे खरं आहे! प्रसिद्ध खेळाडूचे 35 वर्षांपूर्वीचे Shoes 4.60 कोटींना विकले झूम अॅपमार्फत कधीच एक लाख लोक एकाच वेळी एकत्र आले नाही. त्यामुळे झूम अॅपचाही हा वर्ल्ड रेकॉर्ड असू शकतो, असा दावा केला जातो आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या