Home /News /lifestyle /

Hair Wash Tips: उन्हाळ्यात किती वेळा केस धुणे आवश्यक आहे?, जाणून घ्या

Hair Wash Tips: उन्हाळ्यात किती वेळा केस धुणे आवश्यक आहे?, जाणून घ्या

Hair Wash Tips: विशेषत: महिलांसाठी, त्यांच्या केसांचं आरोग्य खूप महत्त्वाचं असतं. महिलांचे लांब (Long Hair) आणि दाट केस त्यांच्या सौंदर्यात भर घालतात, तर काहींना छोटे केस (Short Hair) आवडतात.

नवी दिल्ली, 24 मे: आपले केस (Hair) निरोगी आणि सुंदर दिसावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. केस हे चेहऱ्याला वेगळा लूक देतात त्यामुळे अनेक जण केसांवर वेगवेगळे प्रयोग करत राहतात. विशेषत: महिलांसाठी, त्यांच्या केसांचं आरोग्य खूप महत्त्वाचं असतं. महिलांचे लांब (Long Hair) आणि दाट केस त्यांच्या सौंदर्यात भर घालतात, तर काहींना छोटे केस (Short Hair) आवडतात. पुरुषांच्या तुलनेत महिला त्यांच्या केसांकडे जास्त लक्ष देतात. वेगवेगळ्या हेअर स्टाईल आणि आणखी नवनवीन प्रयोग त्या केसांवर करत असतात. पण उन्हाळा (Summer) सुरू झाला की, केसांशी संबंधित समस्या सुरू होतात. कडक सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात, तर घामामुळे केसांच्या मुळांमध्ये बुरशी आणि खाज सुटण्याची समस्या वाढते. त्यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात, केस निस्तेज दिसू लागतात. उन्हाळ्यात घामामुळे केस खूप तेलकट होतात, त्यामुळे केसांच्या समस्येत वाढ होते. तर उन्हाळ्यात आठवड्यात किती वेळा केस धुणं योग्य आहे, तसंच केस धुण्याची वेळ झाली आहे, हे कसं ओळखावं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.  पावसाळ्यात घर, संसाराचं नुकसान टाळायचं असेल आजच या गोष्टींची तयारी करा उन्हाळ्यात दर दोन ते तीन दिवसांनी केस धुणं आवश्यक आहे. केस धुतल्यानंतर त्याचदिवशी केस चिकट वाटत असतील तर तुम्हाला केस धुण्याची गरज आहे; पण कोणत्याही कारणाने तुम्ही तुमचे केस धुवू शकत नसाल तर तुम्ही ड्राय शाम्पू (Dry Shampoo) देखील वापरू शकता. त्यामुळे हेअर स्टाईल (Hair Style) करताना कोणतीही अडचण येणार नाही. या संदर्भात दैनिक जागरणने वृत्त दिलंय. केस कितीही घाण आणि अस्वच्छ असले तरीही ते बाहेरून दिसत नाहीत. परंतु, तुम्ही नखांनी टाळू हलकेच स्क्रॅच केल्यास ती घाण नखांमध्ये स्पष्टपणे दिसते. त्यामुळे तुम्ही केस वेळोवेळी धुवायलाच हवेत. केस धुतल्यानंतर आणि विंचरल्यानंतर छान आणि मोकळे दिसतात. परंतु, तुमचे केस जर बोटांच्या किंवा कंगव्याच्या मदतीने सहज सोडवता येत नसतील आणि गुंतत असतील तर तुमचे केस घाण झाले आहेत, असं समजून तुम्ही केस धुवायला हवेत. शाम्पू केल्यानंतर केसांना वेगळीच चमक आणि सुगंध येतो; पण केस धुण्याची वेळ जवळ येते तसतशी ही चमक आणि सुगंध कमी होतो. त्यावेळी हे संकेत समजून तुम्ही केस धुवा. जेव्हा केस कोरडे, निर्जीव आणि निस्तेज दिसू लागतात, तेव्हा तुम्ही केस धुवायला हवेत. चांगल्या शाम्पूने नीट केस धुतल्यास त्याची चमक परत दिसू लागते. चांगले केस तुमच्या सौंदर्यात भर घालतात. Constipation Problem: बद्धकोष्ठता असेल तर या '3 C' पासून लांबच राहा; आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितले कारण अनेक महिलांना केस ही त्यांची संपत्ती वाटते, त्यामुळे संपत्तीची निगा राखणं ही जबाबदारीच होते. वर सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि केसांची काळजी घेतलीत तर तुमचेही केस स्वच्छ, सुंदर, तजेलदार आणि सुगंधी होतील.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Health Tips, Woman hair

पुढील बातम्या