मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

उन्हाळ्यात Oily केसांच्या समस्येने त्रस्त? या आहेत सोप्या टिप्स

उन्हाळ्यात Oily केसांच्या समस्येने त्रस्त? या आहेत सोप्या टिप्स

लांबसडक केसं महिलांच्या सौंदर्यात भर घालतात.

लांबसडक केसं महिलांच्या सौंदर्यात भर घालतात.

केस ऑइली असतील, तर एखाद्या वेळी शँपूने धुवून ते छान दिसतात. पण समस्या कायमची सुटत नाही. काय करायचं अशा केसांचं?

  • Published by:  News18 Desk

दिल्ली,18 मे : उन्हाळा (Summer) सुरु झाला की, अनेक समस्या (Probmlem) सुरु होतात. आरोग्याच्या,त्वचेच्या आणि केसांच्या समस्या डोकं वर काढतात.  उन्हाळ्यात तर, केस चिकट आणि ऑयली (Oily Hair) होण्याची समस्या वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेबरोबर केसांचीही काळजी घ्ययला हवी.

पण, सगळ्यांनाच आपल्या केसांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. अशा वेळी एखादा शॅम्पू (Shampoo) वापरुन केस धुतल्याने समस्या तात्पुरती सुटते पण, संपत नाही. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी (Healthy Hair) त्यांना मुळापासून पोषण (Nutrition) मिळायला हवं. त्यासाठी चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट (Quality Product) वापरायला हवेत किंवा काही घरगुती उपायही फायद्याचे असतात.

(Olympic Champion चा ब्रेस्टफीडिंग करत शीर्षासन करणारा फोटो VIRAL)

ऑयली केसांपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय जाणून घेऊ यात.

एसेन्शियल ऑईल

केसांना शॅम्पू लावण्याआधी केसांना एसेन्शियल ऑईल (Essential Oil) लावावं. एक मोठा चमचा पाण्यात 10 थेंब एसेंशियल ऑईल टाका. हे मिश्रण चांगलं एकत्र करा. बोटांच्या मदतीने स्कॅल्पला किंवा टाळूला लावा आणि थोड्या वेळाने शॅम्पू करा.

(मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्रावाचा रंग बदलला? घाबरू नका, पण दुर्लक्षही करू नका)

नारळाचं तेल

नारळाचं तेल (Coconut Oil) लावण्याने केसांना फायदा होतो. त्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात. नारळाचं तेल आणि लिंबू रस एकत्र करा. त्यात 4 ते 5 चमचे लवेंडर ऑईल टाका. केसांना हळूवारपणे लावा. 4 ते 5 तसांनी पाण्याने धुवा.

ऍपलसायडस व्हिनेगर

केसांना शॅम्पू लावल्यानंतर ऍपलसायडर व्हिनेगरने (Apple Cider Vinegar) धुवा. केस धुतल्यानंतर पाण्यात ऍपलसायडर व्हिनेगर मिक्स करा. हे पाणी केसांवर टाका. यामुळे केसांचा तेलकटपणा कमी होऊन केस चमकदार होतील.

(चुकूनही दह्याबरोबर खाऊ नयेत या वस्तू; होतील गंभीर परिणाम)

शॅम्पूचा योग्य वापर

ऑयली केस धुवताना शॅम्पूचाही योग्य प्रकारे वापर करावा. जास्त शॅम्पू वापरल्यानेही केसांना हानी पोहचते. शॅम्पू केसांच्या वरच्या भागात लाऊन कंगव्याने पसरवा. त्यामुळे तुमचे केस ऑयली होणार नाहीत. यासाठी ऑईल कंट्रोल शॅम्पूचा वापर करावा.

कंडिशनर

ऑयली केसांना कंडिशनर (Conditioner) लाऊ नये असं सांगितलं जातं. मात्र ऑयली केसांसाठीही कंडीशनर लावायला हवं. पण, कंडीशनर केसांच्या मुळांना न लावता केवळ खालच्या भागाला लावावं. माईल्ड कंडीशनर वापरणं चांगलं. मात्र, केस ऑयली होत असतील तर, हेअर मास्क लाऊ नयेत.

एरंड तेल

एरंड तेला (Castor Oil)चा वापर ऑयली केसांवर अजिबात करु नये. केसांच्या वाढीसाठी चांगलं असणारं हे तेल केस ऑयली असताना लावल्यास ते आणखीन तेलकट होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तू वापरु नयेत.

(Benefits of Yoga : फिट राहण्यासाठी रोज करा सूर्यनमस्कार; जाणून घ्या योग्य पद्धत)

कंगव्याचा वापर

ऑयली केसांना सतत विंचरू नये. कारण त्यामुळे केसांमध्ये जास्त प्रमाणात सीबम वाढतं. पण, केसांमधला गुंता योग्य पद्धतीने काढायलाही हवा. त्यामुळे केसांसाठी हेअर ब्रश वापरून केस मोकळे करावेत. मात्र, जास्त वेळा हेअर ब्रशही वापरु नये.

कोंडा

ऑयली केसांमध्ये कोंडा (Dandruff) ही जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे केस ऑयली होऊ नयेत यासाठी केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी चांगल्या प्रतीचा शॅम्पू वापरावा.

First published:

Tags: Health Tips, Woman hair