VIRAL VIDEO जाहिरातीसाठी जुगाड : वाऱ्यावर उडणारे चमकदार केस इथे 'बनवून' मिळतील!

VIRAL VIDEO जाहिरातीसाठी जुगाड : वाऱ्यावर उडणारे चमकदार केस इथे 'बनवून' मिळतील!

जाहिरातीत दिसणाऱ्या मॉडेलचे वाऱ्यावर उडणारे भरदार, चमकदार केस नेहमीच कसे परफेक्ट दिसतात? या हेअर स्टायलिस्टने शेअर केला व्हिडिओ.असा आहे तर लंबे घने उडते बालों का जुगाड!

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : शँपू, तेल किंवा कुठल्याही सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीत दिसणाऱ्या मॉडेलचे वाऱ्यावर उडणारे भरदार, चमकदार केस नेहमीच बघणाऱ्याला मोहात पाडतात. लांबसडक, चमकदार केस असणाऱ्या स्त्रियांनाही हेवा वाटावा, असे हे केस सुंदर दिसतात आणि वाऱ्याच्या झोतावर अगदी सुरेख उडतात. यांचे केस असे कसे वाऱ्यावर उडूनसुद्धा नीट राहतात, केस किती व्यवस्थित सेट केलेले राहतात, केसांची शाईन किती सुंदर असते... हा नेहमीचा आश्चर्याचा, विस्मयाचा, हेव्याचा आणि कौतुकाचा विषय.

जाहिरात शूट करताना पंखा लावून कृत्रिम वाऱ्यावर उडणारे केस दाखवत असतील, असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात जाहिरातवाले काय जुगाड करतात ते एका व्हिडिओतून पुढे आलं आहे. एका हेअर आर्टिस्टनेच हा व्हिडिओ सोशल मीडिया साइटवर शेअर केला आहे. एका शँपू कँपेनची तयारी असं तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. वाऱ्यावर उडणारे केस तयार करताना... असं म्हणत तिने नेमकी काय जादू केली आहे, हे या व्हिडिओतच पाहा

वाऱ्यावर उडणारे केस असे तयार केले जातात, हे या व्हिडिओतून कळेल. मॉडेल अँजेला व्हरगॉक Angela Vrgoc हिच्या केसांवर हा प्रयोग करण्यात आला आहे. Instagram वर हा व्हिडिओ शेअर झाल्यावर अनेक यूजरने यावर कमेंट केल्या आहेत. हे खूप भारी असल्याचं अनेकांनी म्हटलंय. कशावरही विश्वास ठेवता येणार नाही, असंही एका यूजरने म्हटलं आहे.

कुरळ्या केसांचा अभिमान कायम ठेवायचा असेल तर अशी घ्या केसांची काळजी!

तुमचं केस गळणं आता आलं थांबवणार!

-------------------------------------------------------

वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

First published: September 11, 2019, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading