मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair Straightening : केस सरळ करण्याची सुरक्षित पद्धत शोधताय? या पद्धतींनी घरीच करा हेअर स्ट्रेटनिंग

Hair Straightening : केस सरळ करण्याची सुरक्षित पद्धत शोधताय? या पद्धतींनी घरीच करा हेअर स्ट्रेटनिंग

घरीच कुरळे केस बनवा सरळ

घरीच कुरळे केस बनवा सरळ

माणसाच्या इच्छा क्षणोक्षणी बदलतात. मात्र कुरळे केस असलेल्या महिलांना सरळ केसांची केवळ इच्छाच नसते तर कधी कधी ती गरजही असते.

  मुंबई, 20 ऑगस्ट : केस कुरळे असले की, आपल्याला सरळ केस हवे असतात. आणि सरळ केस असले की कुरळे हवे असतात. माणसाच्या इच्छा क्षणोक्षणी बदलतात. मात्र कुरळे केस असलेल्या महिलांना सरळ केसांची केवळ इच्छाच नसते तर कधी कधी ती गरजही असते. अनेकदा कुरळे केस सांभाळणं खूप अवघड होऊन जात. मात्र कुरळे केस पार्लरमध्ये जाऊन सरळ करणं खूप खर्चिक आणि महागडी प्रक्रिया असते. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरीच अगदी कमी पैशात तुमचे कुरळे केस सरळ करू शकता. मध आणि दुध झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, केसांमध्ये केराटिन प्रोटीन असते. दुधामध्ये प्रोटिन्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यात फॅटही असते. ज्यामुळे केस सरळ आणि मऊहोतात. तर मध तुमच्या केसांना चमकदार बनवते.

  Tips for Hair Care : केसांचं नुकसान करतात 'या' सवयी; तुम्हालाही असेल अशी सवय तर लगेच करा बदल

  एका भांड्यात 1 चमचा मध आणि 1 कप दूध घाला. दोन्ही गोष्टी एकत्र करून पेस्ट बनवा. शॅम्पूने केस धुवा. त्यानंतर तयार केलेली पेस्ट केसांना लावा. ही पेस्ट केसांवर 5 मिनिटे राहू द्या. 5 मिनिटांनंतर केस सामान्य पाण्याने धुवा. शुद्ध म्हणून पावसाचे पाणी पिण्याआधी सावधान! नवीन संशोधनात धक्कादायक दावा तांदळाचे पीठ, मुलतानी माती आणि अंडी केसांसाठी अंडी खूप फायदेशीर असतात. याने तुम्ही तुमचे केस सहज सरळ करू शकता. भांड्यात 1 अंड्याचा पांढरा बलक, 1/4 कप तांदळाचे पीठ आणि 1 कप मुलतानी माती घाला. ते चांगले मिसळा. तयार केलेली पेस्ट केसांना लावा. नंतर केस हळुवार विंचरा, जेणेकरून ते केसांना चांगले लावले जाईल. ही पेस्ट केसांवर 1 तास राहू द्या. त्यानंतर केस सल्फेट-फ्री शाम्पूने व्यवस्थित धुवा.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Home remedies, Lifestyle, Women hairstyles

  पुढील बातम्या