Home /News /lifestyle /

टक्कल पडण्याची भीती दिवस-रात्र सतावतेय? केस गळती थांबवण्यासाठी मेथी-कांद्याचा असा करा वापर

टक्कल पडण्याची भीती दिवस-रात्र सतावतेय? केस गळती थांबवण्यासाठी मेथी-कांद्याचा असा करा वापर

Hair Mask For Hair Growth : केस गळती धोकादायक होण्याआधीच थांबवणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही होममेड हेअर मास्कची (Homemade Hair Mask) मदत घेऊ शकता. हा मास्क मेथीच्या बिया आणि कांद्या (Onion And Fenugreek Seeds) पासून तयार केला जातो जो नवीन केसांच्या वाढीस खूप मदत करतो.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 13 जानेवारी : केस गळणं (Hair Fall) ही बाब नैसर्गिक आहे. परंतु, जुन्या केसांच्या जागी नवीन केस येत नसतील तर ही समस्या बनू शकते. दररोज 50 ते 100 केस गळणं ही समस्या नाही, असं मानलं जातं. त्यांच्या जागी नवीन केस वाढतात आणि पुन्हा केस दाट आणि निरोगी होतात. पण काही लोकांचे केस गळतात आणि त्या प्रमाणात नवीन केस उगवत नाहीत. यामुळं डोक्याला टक्कल पडणं, ठिपके येणं यांसारख्या खुणा तयार होऊ लागतात. काही वेळा याचं कारण हार्मोन्समध्ये होणारे बदल, औषधांचे दुष्परिणाम किंवा खाण्याच्या सवयी फार गांभीर्यानं न घेणं हे असू शकतं. ही परिस्थिती धोकादायक होण्याआधीच थांबवणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही होममेड हेअर मास्कची (Homemade Hair Mask) मदत घेऊ शकता. हा मास्क मेथीच्या बिया आणि कांदे (Onion And Fenugreek Seeds) पासून तयार केला जातो जो नवीन केसांच्या वाढीस खूप मदत करतो. केसांसाठी मेथीचे फायदे मेथी दाणे केसांसाठी एनर्जी बूस्टर म्हणून काम करतात. मेथीच्या दाण्यांमध्ये लेसिथिन असतं. ते नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतं. मेथीच्या दाण्यांमध्ये फॉलिक अॅसिड, ए, के आणि सी जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात (Hair Mask For Hair Growth) असतात. शिवाय, त्यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. मेथी त्वचेचं पोषण आणि केस गळती रोखण्याचं काम करते. केसांना जाड आणि निरोगी बनवून त्यांची वाढ होण्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे. त्यात दाह-विरोधी गुणधर्म आणि अनेक खनिजं, क्षार असतात. त्यामुळं खराब झालेल्या केसांना पुन्हा तजेला येतो. हे वाचा - वार्षिक राशीभविष्य 2022: मकर राशीसाठी सुरुवात खडतर पण एप्रिलमध्ये फळफळेल भाग्य केसांसाठी कांद्याचे फायदे कांद्यामध्ये सल्फर मुबलक प्रमाणात असतं. याच्यामुळं केस पातळ होणं आणि तुटणं यासारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होते. कांद्यामध्ये फॉलिक अ‌ॅसिड, सल्फर आणि व्हिटॅमिन सीसारखे शक्तिशाली घटक असतात. सल्फर केस तुटण्याचं आणि पातळ होण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं. तसंच, केस पुन्हा वाढण्यासही चालना देतं. कांद्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि बुरशीविरोधी (अँटीफंगल - Antifungal) गुणधर्म देखील असतात. याच्यामुळं केसांच्या मुळांशी संसर्ग होण्यास प्रतिबंध होतो. तसंच, केस अकाली पांढरे होणं कमी होतं. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात मेथी आणि कांदा हेअर मास्क कसा बनवायचा मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याची बारीक पेस्ट तयार करा.आता मध्यम आकाराच्या कांद्याचा अर्धा तुकडा बारीक करून घ्या आणि रस मलमलच्या कापडाने गाळून घ्या. आता एका भांड्यात मेथीची पेस्ट आणि कांद्याचा रस एकत्र मिक्स करा आणि केस आणि मुळांना लावा. एक तासानंतर सौम्य शाम्पूनं केस धुवा. आठवड्यातून एक दिवस हे करण्यामुळं केस गळणं कमी होतं. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Woman hair

    पुढील बातम्या