मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair Loss Tips : या 5 कारणांमुळे केसांची गळती वाढतच जाते, वेळीच ओळखा त्याची कारणे

Hair Loss Tips : या 5 कारणांमुळे केसांची गळती वाढतच जाते, वेळीच ओळखा त्याची कारणे

अलिकडे केस गळण्यामागे सामान्यतः जास्त ताणतणाव, चुकीची जीवनशैली आणि वाढते प्रदूषण हे कारण सांगितले जाते, पण तुमचे केस नक्की का गळत आहेत, याची वेगवेगळी कारणे असू शकतात.

अलिकडे केस गळण्यामागे सामान्यतः जास्त ताणतणाव, चुकीची जीवनशैली आणि वाढते प्रदूषण हे कारण सांगितले जाते, पण तुमचे केस नक्की का गळत आहेत, याची वेगवेगळी कारणे असू शकतात.

अलिकडे केस गळण्यामागे सामान्यतः जास्त ताणतणाव, चुकीची जीवनशैली आणि वाढते प्रदूषण हे कारण सांगितले जाते, पण तुमचे केस नक्की का गळत आहेत, याची वेगवेगळी कारणे असू शकतात.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 09 डिसेंबर : एका विशिष्ट संख्येपर्यंत केस गळणे (Hair Loss) सामान्य बाब असू शकते, परंतु तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर तो तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनतो. अलिकडे केस गळण्यामागे सामान्यतः जास्त ताणतणाव, चुकीची जीवनशैली आणि वाढते प्रदूषण हे कारण सांगितले जाते, पण तुमचे केस नक्की का गळत आहेत, याची वेगवेगळी कारणे असू शकतात. विशेषत: महिलांमध्ये केस गळण्याची कोणती कारणे असू शकतात (Hair Loss In Women) त्याबद्दल जाणून घेऊया.

आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, केस गळणे थांबवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने असली तरी त्यांचा वापर करून विशेष फायदा होत नाही. अशा स्थितीत तुमचे केस गळण्याचे कारण काय आहे हे आधी जाणून घेणे गरजेचे आहे.

1. अशक्तपणामुळे (Weakness) केस गळणे

अनेक वेळा आहारातील निष्काळजीपणामुळे महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होते, त्यामुळे त्या अॅनिमियाच्या बळी ठरतात. यामुळे कुपोषण, मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव आणि शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे केस गळणे सुरू होते.

2. रजोनिवृत्तीमुळे केस गळणे

काही स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात केस गळतात. कारण आजकाल शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात ज्याचा थेट परिणाम केसांवर होतो. रजोनिवृत्तीच्या लक्षणांवर मात करून तणावमुक्त जीवन जगण्याची सवय लावून घेतल्यास तुमचे केसही निरोगी राहतील आणि त्यांची गळती थांबेल.

हे वाचा - Alert! भारतातील Omicron रुग्णांमध्ये एका बाबतीत साम्य; दिलासा नव्हे तर धोक्याची घंटा

3. डाएटिंगमुळे केस गळतात

वजन कमी करण्यासाठी बहुतांश महिला डायटिंग करतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. योग्य आहार न घेतल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवते, ज्याचा थेट परिणाम केसांवर होतो आणि केस गळू लागतात. त्यामुळे जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डाएट प्लॅन करा.

4. गर्भधारणा आणि जन्म नियंत्रण औषधांचा वापर

डॉ. अबरार मुलतानी यांनी 'झी न्यूज'ला दिलेल्या बातमीनुसार, गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांमुळे अनेक वेळा केस गळतात, परंतु या दिवसांत जर तुम्ही पुरेसे जीवनसत्त्वे, लोह इत्यादी घेतल्यास गेलेल केस परत येतात. याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांचा सतत वापर केल्याने केस गळतात.

हे वाचा - धक्कादायक! मुलाने केला वडिलांच्या प्रेयसीचा खून, रोजच्या भांडणांना वैतागून केले वार

5. थायरॉईड समस्या

थायरॉईडच्या समस्या असतानाही केस गळतात. थायरॉईड ग्रंथी ही शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी आहे, ज्यामध्ये असंतुलन निर्माण झाल्यास तुमच्या शरीराला अनेक समस्यांमधून जावे लागते. केस गळतीचे हे देखील एक कारण आहे. जर तुम्हाला हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझमचा सामना करावा लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्या.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published: