मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair Gain Tips: केसांच्या समस्या दूर होण्यासाठी या` तेलांचा वापर ठरेल फायदेशीर

Hair Gain Tips: केसांच्या समस्या दूर होण्यासाठी या` तेलांचा वापर ठरेल फायदेशीर

Hair Gain Tips: केसांच्या समस्या दूर होण्यासाठी `या` तेलांचा वापर ठरेल फायदेशीर

Hair Gain Tips: केसांच्या समस्या दूर होण्यासाठी `या` तेलांचा वापर ठरेल फायदेशीर

Hair Gain Tips: सध्याच्या काळात वायू प्रदूषण, चुकीचा आहार, ताण तणाव आदी गोष्टींमुळे केसांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. यामुळे केस गळणं, केस रुक्ष होणं आणि टक्कल पडणं या समस्या वाढताना दिसत आहेत.

मुंबई, 13 ऑगस्ट: आपले केस (Hair) मुलायम, दाट असावेत असं प्रत्येकाला वाटतं. पण सध्याच्या काळात वायू प्रदूषण, चुकीचा आहार, ताण तणाव आदी गोष्टींमुळे केसांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. यामुळे केस गळणं, केस रुक्ष होणं आणि टक्कल पडणं या समस्या वाढताना दिसत आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून अनेक लोक हर्बल प्रॉडक्ट, विविध प्रकारची तेलं वापरतात; पण अपेक्षित परिणाम दिसून येतोच असं नाही. केसांशी निगडित कोणतीही समस्या दूर होण्यासाठी बऱ्याचदा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. केस नव्यानं उगवावेत यासाठी नेमकं कोणतं तेल (Oil) वापरावं, असा सल्लाही लोक डॉक्टरांना विचारतात. केसांच्या आरोग्यासाठी बदाम तेल, खोबरेल तेल आणि आयुर्वेदिक तेल फायदेशीर ठरू शकतं. `ओन्ली माय हेल्थ डॉट कॉम`ने या विषयीची माहिती दिली आहे. अनेक लोकांना केस गळणं (Hair Fall), कोरडे होणं आणि टक्कल पडणं या समस्या जाणवतात. या समस्या दूर होण्यासाठी ते अनेक उपाय करतात; पण काही तेलांच्या वापराने या समस्या दूर होऊ शकतात. तसंच नव्याने केस येण्याची प्रक्रियादेखील सुरू होते. मध्य प्रदेशातल्या इंदूर येथील आरोग्य क्लिनिक आणि ऋषी कृपा फार्मास्युटिकल्स येथील संशोधक डॉ. एच. एस. चौहान यांनी याबाबत मार्गदर्शन केलं आहे. ते म्हणाले, केस तुटणं, गळणं या समस्या दूर होण्यासाठी विविध उपायांसोबतच आहाराकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. तसंच काही प्रकारची तेलं वापरून या समस्या दूर होऊ शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, "केस गळणं, तुटणं यासमस्येमुळे टक्कल पडलं असेल तर आयुर्वेदिक तेलांच्या वापरातून केस पुन्हा नव्यानं येऊ शकतात. जर तुमचे डोक्याच्या पुढच्या बाजूचे केस गळत असतील तर तुम्ही आवळा (Amla), भृंगराज किंवा रिठ्यापासून तयार केलेलं कोणतंही आयुर्वेदिक तेल (Ayurvedic Oil) वापरू शकता. केसांवर आयुर्वेदिक तेल लावताना ते नॉनस्टिकी नाही ना, याची खात्री करून घ्या. तेल नॉनस्टिक होण्यासाठी खनिज तेलाचा वापर केला जातो. या तेलामुळे डोक्याच्या त्वचेवर परिणाम होतो." Weight Loss In Sleep : आता आरामशीर झोपेदरम्यानही होईल वजन कमी, फक्त फॉलो करा या टिप्स केस गळणं, तुटणं आणि टक्कल पडणं या समस्या असतील तर तज्ज्ञ बदाम तेल (Almond oil) वापरण्याचा सल्ला देतात. बदाम तेलात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतं. यामुळे डोक्याच्या त्वचेचं पोषण होतं आणि केस गळणं, तुटणं थांबतं. डॉ. चौहान यांच्या मते, केसांची समस्या दूर होण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर करताना ते शुद्ध आहे, याची खात्री करून घ्या. बाजारात उपलब्ध असलेल्या बदाम तेलांत रसायनांचा वापर केलेला असतो. यामुळे स्कॅल्पवर परिणाम होतो. बदाम तेलामुळे केसांमधील धुळीचे कण निघून जातात आणि केस चमकदार होतात. केसांशी निगडित प्रत्येक समस्येवर इलाज म्हणून खोबरेल तेलाचा (Coconut oil) वापर केला जातो. या तेलामुळे केस गळणं, कोंडा होणं, केस तुटणं या समस्या दूर होतात. ज्या लोकांचे केस नुकतंच तुटणं किंवा गळणं सुरू झालं आहे त्यांनी आठवड्यातून तीन ते चार वेळा किमान 15 ते 20 मिनिटं खोबरेल तेलानं मालिश करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
First published:

Tags: Woman hair

पुढील बातम्या