मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair Dandruff : केसांचा कोंडा घालवण्यासाठी रामबाण उपाय आहे बदामाचे तेल, असा करा वापर

Hair Dandruff : केसांचा कोंडा घालवण्यासाठी रामबाण उपाय आहे बदामाचे तेल, असा करा वापर

कोंड्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकता. यातील सर्वात उत्तम उपाय म्हणजे बदामाचे तेल. बदामाच्या तेलासोबत आणखी काही पदार्थ मिसळून तुम्ही कोंड्यापासून मुक्ती मिळवू शकता.

  मुंबई, 12 ऑगस्ट : पावसाळ्यात आरोग्याच्या इतर समस्यांबरोबर केसांमध्ये कोरडेपणा आणि कोंडाही मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे जिथे टाळूला खाज सुटण्याची समस्या उद्भवते. तिथे कोंडाही त्रासाचे कारण बनतो. इतकंच नाही तर केसांमध्ये कोंडा झाल्यामुळे काही वेळा लोकांसमोर लाजिरवाणे व्हावे लागते. त्यामुळे कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या अँटी-डँड्रफ शॅम्पू आणि केसांची निगा राखणाऱ्या उत्पादनांची मदत घेतात. मात्र तरीदेखील या समस्येपासून पूर्णपणे सुटका मिळत नाही. तेव्हा कोंड्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकता. यातील सर्वात उत्तम उपाय म्हणजे बदामाचे तेल. बदामाच्या तेलासोबत आणखी काही पदार्थ मिसळून तुम्ही कोंड्यापासून मुक्ती मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल. बदामाचे तेल आणि लिंबाचा रस लिंबाचा रस बदामाच्या तेलात मिसळून केसांवर लावल्यास कोंड्याच्या समस्येवर मात करता येते. यासाठी एका भांड्यात थोडे बदाम तेला आणि थोडा लिंबाचा रस घ्या. हे मिश्रण केसांना लावा आणि तुमच्या केसांना हलक्या हातांनी मसाज करा. मसाज केल्यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 1 तासानंतर तुमचे केस शॅम्पू करू शकता किंवा तुम्ही हे मिश्रण रात्रभर केसांना लावून दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवू शकता. असे केल्याने केसांची वाढही जलद होते.

  Skin Care Tips : तुम्ही वारंवार चेहरा धुता का? वेळीच बदला ही सवय, त्वचेचे होते हे नुकसान

  बदामाचे तेल आणि मध बदामाचे तेल, मध आणि केळी कोंड्याची समस्या दूर करू शकतात. यासाठी एका भांड्यात बदामाचे तेल, मध आणि केळी हे तिन्ही चांगले एकत्र करा आणि ते मिश्रण केसांना लावा. हे मिश्रण तुमच्या केसांवर अर्धा तास किंवा 1 तास लावल्यानंतर सौम्य शॅम्पूने केस चांगले धुवा. असे केल्याने केसांमधील कोंडा तर कमी होतोच पण केस चमकदारही होतात.

  Beauty Tips For Women In 50's : वयाच्या पन्नाशीतही दिसायचंय चिरतरुण? फॉलो करा ब्युटी टिप्स

  खोबरेल तेल आणि कापूर कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही बदामाच्या तेलाऐवजी खोबरेल तेलदेखील वापरू शकता. खोबरेल तेल आणि कापूर घ्या. कापूर चांगला बारीक करून खोबरेल तेलात मिसळा. नंतर केसांच्या मुळांमध्ये लावा आणि थोडा वेळ मसाज करा, त्यानंतर तासाभराने केस स्वच पाण्याने आणि एखाद्या सौम्य शॅम्पूने धुवा.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Home remedies, Lifestyle, Woman hair

  पुढील बातम्या