नवी दिल्ली, 27 जानेवारी : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत योग्य आहार न घेतल्यानं तणाव आणि चिडचिड यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि केसांवर होतो. यामुळं केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि केसांना सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी लोक खूप काही करत असतात. पार्लरपासून ते महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. यामध्ये मेंदीचा समावेश आवर्जून केला (Tips to Apply Mehndi in Hair) पाहिजे.
जवळजवळ प्रत्येकानं कधी ना कधी मेंदीचा वापर केलेला असतो. काही लोक पांढरे केस लपवण्यासाठी मेंदी लावतात. तर, काही लोक केसांना रेशमी आणि चमकदार बनवण्यासाठी मेंदी लावतात. परंतु, बहुतेक लोकांना मेंदी लावण्याची योग्य पद्धत माहीत नसते. त्यामुळं केसांना मेंदीचा रंग चांगला येत नाही. मेंदी लावताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची मेंदी काळी तर होईलच आणि त्याचा प्रभाव तुमच्या केसांवर दीर्घकाळ टिकेल. जाणून घ्या, याबद्दलच्या सोप्या टिप्स.
वेळेच्या मर्यादेची घ्या विशेष काळजी
काही लोक त्यांच्या व्यग्र दिनचर्येमुळं मेंदी भिजवल्यानंतर लगेच लावतात. त्यामुळं केसांना मेंदीचा रंग पूर्णपणे येत नाही आणि त्याचबरोबर त्यांचा वेळही वाया जातो. म्हणूनच, मेंदी भिजवल्यानंतर ती चांगली भिजण्यासाठी पुरेसा वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे. सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, केसांना किमान 10 ते 12 तास भिजवल्यानंतरच मेंदी लावावी. असं केल्यानं केसांना मेंदीचा रंग चांगला येतो.
साध्या पाण्यात मेंदी विरघळणे टाळा
अनेक वेळा घाईमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे आपण साध्या पाण्यात मेंदी भिजवतो. पण मेंदी लावण्याची ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. चांगल्या आणि प्रभावी रंगासाठी मेंदी नेहमी कॉफी किंवा चहाच्या पानांच्या पाण्यात भिजवावी. यामुळं मेंदीचा रंग केसांवर खूप चांगला येतो. जर तुम्ही पांढरे केस काळे करण्यासाठी मेंदी लावत असाल, तर मेंदी लोखंडी कढईत भिजवल्यास जास्त फायदा होईल.
हे वाचा -
Hair Care Tips: महागडे अँण्टी डँड्रफ शॅम्पू हवेत कशाला, केसांसाठी कढीपत्त्याचा असा वापर करून बघा परिणाम
मेंदीमध्ये लिंबू वापरू नका
लिंबू हा सौंदर्याचा खजिनाच असल्याचं म्हटलं जातं. यामध्ये असलेलं सायट्रिक अॅसिड त्वचेत चमक आणण्यासोबतच केसांमधील कोंडा दूर करण्यास मदत करते. पण मेंदीमध्ये लिंबाचा वापर केसांसाठी हानिकारक ठरू शकतो.
हे वाचा -
Best Oils For Hair: फक्त खोबरेल तेलच नाही, थंडीच्या दिवसात हे 5 तेल केसांना देतील संपूर्ण पोषण
मेंदी लावण्याआधी केसांना तेल लावू नका
केसांना रंग देण्यासोबतच केसांना मुलायम आणि रेशमी बनवण्यासाठी मेंदीचा वापर केला जातो. तसंच मेंदी लावण्यापूर्वी केसांना कधीही तेल लावू नका. कारण असं केल्यानं केसांवर तेलाचा एक थर तयार होतो. यामुळं केसांना मेंदीचा चांगला रंग येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.