
खोबरेल तेल -
होळीमध्ये रंग खेळण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावल्याने केसांना रंग चिकटत नाही. तसेच, धुताना त्यामुळे रंग सहजपणे निघून जातो. यासोबतच खोबरेल तेलात व्हिटॅमिन-ई आणि फॅटी अॅसिड आणि इतर सर्व पोषक घटक असतात, जे केसांना पोषण देतात. त्यामुळे होळी खेळण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावणे फायदेशीर ठरेल.

मोहरीचे तेल
मोहरीचे तेल पारंपारिकपणे अनेक समस्यांवर उपयोगी आहे. होळी- रंगपंचमी खेळण्याच्या अर्धा तास आधी केसांना मोहरीचं तेल लावल्यास केसांवर रंग राहत नाही. तसेच, धुताना कोणत्याही शॅम्पूच्या वापराने हे रंग सहज काढता येतात. त्यामुळे होळीमध्ये रंग खेळण्याच्या तासभर आधी केसांमध्ये मोहरीचे तेल लावले तर त्यामुळे रंगांचा केसांवर परिणाम होणार नाही. (प्रतिकात्मक छायाचित्र)

लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क -
ऑलिव्ह ऑइल हे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण त्यात लिंबू घातल्यास त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. होळीमध्ये रंग खेळण्यापूर्वी लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल मिसळून बनवलेला हेअर मास्क लावा. यामुळे केसांचे रंगांपासून संरक्षण तर होतेच पण उत्तम पोषणही मिळते.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.