Home /News /lifestyle /

Hair Care Tips: महागडे अँण्टी डँड्रफ शॅम्पू हवेत कशाला, केसांसाठी कढीपत्त्याचा असा वापर करून बघा परिणाम

Hair Care Tips: महागडे अँण्टी डँड्रफ शॅम्पू हवेत कशाला, केसांसाठी कढीपत्त्याचा असा वापर करून बघा परिणाम

Hair Care Tips: कढीपत्ता आपल्या भाजीची चव तर वाढवतोच पण ते एक महत्त्वाचे औषधही आहे. ज्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स व्यतिरिक्त अनेक पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी आणि विशेषतः केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात.

    मुंबई, 19 जानेवारी : भाजी करण्यासाठी आपण अनेकदा कढीपत्ता (Curry leaves) वापरतो. कढीपत्त्यामुळे भाजीला चांगली चव येते. पण तुम्हाला माहीत आहे का, की कढीपत्त्यामध्ये Curry-patton देखील भरपूर प्रमाणात आढळते जे आपल्या आरोग्यासाठी आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरते. केस गळणे आणि कोंडा यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कढीपत्ता देखील विशेष भूमिका (Hair Care Tips) बजावू शकतो. कढीपत्ता आपल्या भाजीची चव तर वाढवतोच पण ते एक महत्त्वाचे औषधही आहे. ज्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स व्यतिरिक्त अनेक पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी आणि विशेषतः केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया अशा काही टिप्स ज्या कढीपत्त्याच्या साहाय्याने आपले केस निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. कढीपत्त्यामुळे कोंडा कमी होतो कोंडा घालवण्यासाठी कढीपत्ता बारीक करून दह्यात मिसळा. यानंतर या पेस्टने केसांच्या मुळांना मसाज करा आणि किमान अर्धा तास तसंच राहू द्या आणि नंतर धुवा. यामुळे तुमच्या केसांमधील कोंड्याची समस्या दूर होईल. फक्त फार थंडीमध्ये याचा वापर करू नका, कारण यामुळे तुम्हाला थंडीही जाणवू शकते. पांढऱ्या केसांसाठी कढीपत्त्याचा वापर तुमच्या पांढर्‍या केसांसाठीही खूप फायदेशीर ठरतो. यासाठी खोबरेल तेलात काही मेथीदाणे भाजून घ्या. आणि दाणे चांगले लालसर झाल्यावर त्यात कढीपत्ता घाला. नंतर त्यात किसलेला कांदाही घाला. सुमारे दहा मिनिटे परतून घ्या नंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि कुपी किंवा बॉक्समध्ये ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने डोक्याला मसाज करा आणि सकाळी चांगल्या शॅम्पूने डोके धुवा. असे नियमित केल्याने तुमच्या डोक्यावरील केस काळे होऊ लागतात. मेंदीसोबत कढीपत्ता वापरा कढीपत्ता बारीक करून केस काळे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेंदीमध्ये मिसळा. यामुळे केसांचा काळा रंग बराच काळ टिकून राहतो आणि ते मुलायम आणि चमकदारही राहतात. हे वाचा - या 3 समस्यांमुळे येतो हाडातून कट-कट असा आवाज, वेळीच व्हा सावध! अशाप्रकारे घरीच घ्या काळजी केस गळणे थांबते कढीपत्त्यामुळे केसगळती थांबते, यासाठी खोबरेल तेलात काही कढीपत्ता मिसळा आणि कढीपत्त्याचा रंग काळा होईपर्यंत गरम करा. यानंतर, मिश्रण गाळून घ्या आणि बॉक्समध्ये किंवा कुपीमध्ये ठेवा. याच्या नियमित वापराने केस गळणे थांबते. शिवाय केस नेहमीपेक्षा अधिक मजबूत होतात. याशिवाय या रेसिपीमुळे तुमच्या केसांमधील ओलावाही कायम राहतो. हे वाचा - टक्कल पडण्याची भीती दिवस-रात्र सतावतेय? केस गळती थांबवण्यासाठी मेथी-कांद्याचा असा करा वापर केसांची वाढ केसांची नीट वाढ होत नसेल तर यासाठीही कढीपत्ता हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. यासाठी कढीपत्त्याच्या पानांसह मेथी आणि आवळ्याची पेस्ट बनवा. त्यानंतर केसांच्या मुळांमध्ये हलके मसाज करा आणि काही वेळाने डोके धुवा. अशा प्रकारे तुमचे केस मजबूत होतात आणि ते सहजासहजी गळणार नाहीत. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या