नवी दिल्ली, 28 जून : दही हे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. केसांमध्ये दह्याचा हेअर मास्क लावल्यास केसांच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. खरं तर, दह्यामध्ये लाखो बॅक्टेरिया असतात जे शरीरात एन्झाईम बनवण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे केसांना दह्याचा मास्क लावल्यास केसांना आतून फ्लेक्सिबल बनवून निरोगी ठेवण्याचे काम करते. त्याचा वापर केल्याने केस रेशमी होतात आणि लहान वयात केस पांढरे होत नाहीत. मेथीचे दाणे दह्यात बारीक करून केसांना लावल्यास केस गळणे, केसांना कोंडा होणे, केस कोरडे होणे या समस्या सहज कमी होतात. जाणून घेऊया केसांना दही लावल्याने कोणते फायदे होतात आणि ते कसे (Benefits Of Applying Curd On Hair) वापरावे याविषयी.
केसांवर दही लावण्याचे फायदे -
डोक्यातील कोंडा -
कोणाच्या केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही केसांमध्ये दही मास्क वापरू शकता. दह्याच्या प्रभावामुळे कोंडा सहज दूर होतो.
पांढरे केस -
केस लहान वयातच पांढरे होऊ लागले तर केसांमध्ये दही वापरा. दह्याच्या नियमित वापराने केसांना पोषण मिळून ते पुन्हा काळे होऊ लागतात.
हे वाचा -
उन्हाळ्यात दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी या 5 गोष्टी आहेत महत्त्वाच्या
केसांची वाढ -
तुमच्या केसांची वाढ चांगली होत नसेल तर केसांना दही लावावे. असे केल्याने तुमचे केस खूप मजबूत होतात आणि लांब वाढतात.
कोरडेपणा -
कोणाचे केस खूप कोरडे आणि कुरळे असतील तर तुम्ही दह्याच्या मदतीने केस मऊ, मुलायम करू शकता.
हे वाचा -
तरुण वयातील हा त्रास उतारवयात अनेक अडचणी आणू शकतो; आत्तापासूनच घ्या काळजी
केसांना दही कसे लावायचे -
केसांमध्ये दही लावण्यासाठी आपण प्रथम आपले केस स्वच्छ आणि कोरडे करणे आवश्यक आहे. यानंतर दही एका भांड्यात घ्या. केसांचे विभाजन करून, हाताने किंवा ब्रशच्या मदतीने दही मुळांवर आणि केसांच्या खालच्या भागात लावा. दही केसांमध्ये सुकते तेव्हा तुमचे केस सामान्य पाण्याने धुवा.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.