ऑफिसमध्ये सतत झोप येते? चहा-कॉफीचा कप उचलण्याआधी हे वाचा...

ऑफिसमध्ये सतत झोप येते? चहा-कॉफीचा कप उचलण्याआधी हे वाचा...

फिसमध्ये काम करताना झोप येते. ही समस्या तुम्हालाही जाणवते का? यावर उपाय म्हणून नुसते चहा आणि कॉफीचे कप रिचवून काही होणार नाही. हे आहेत त्यावरचे खरे उपाय

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : आजच्या स्पर्धेच्या जगात माणसं फक्त कामामागे पळताना दिसतात. दिवसभर कामाचा ताण आणि घरी वैयक्तिक कामांचा व्याप. मग या सर्व व्यापाचा परिणाम होतो विश्रांतीवर. पुरेशी झोप आणि विश्रांती मिळतेच असतं नाही. थोडक्यात काय तर झोपेचे बारा वाजतात.  याशिवाय ऑफिसमध्ये जास्त वेळ काम केलं जातं. साहजिकच कामाच्या वेळी झोप येते. मग, झोप उडावी म्हणून चहा आणि कॉफीचे कप रिचवले जातात. काही जणांचं याविषयी असंही मत आहे की, एकाच जागी सतत बसून काम केल्याने शकवा येतो आणि झोपही येते.  तुमची जीवनशैली आणि सवयी यांच्याशी झोपेचं गणित निगडीत आहे. याविषयीच आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत. जाणून घ्या या समस्येवर तुम्ही कोणते उपाय करु शकता.

एका निरीक्षणामध्ये अशी माहिती समोर आली आहे की, आपल्या काही सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. सतत स्क्रीनसमोर असलेल्यांना झोप येते. ऑफिसमध्ये अनेकांना लंच ब्रेकमध्येही फोन हाताळायची सवय असते. अशा लोकांमध्ये अधिकच थकवा निर्माण होतो.

(हेही वाचा - सोलो ट्रीपला जाण्यासाठी ही 4 ठिकाणी आहेत सगळ्यात भारी!)

त्याचं कारण असं की, फोन वापरत असताना त्यावर आलेले अपडेट चेक करणं किंवा सोशल मीडिया पाहणं हे सातत्याने चालू असतं. त्यामुळे मन रिलॅक्स व्हायच्या ऐवजी चिंता, काळजी, भीती आणि नैराश्य अशा भावनांमध्ये मेंदू व्यग्र होऊन जातो.  क्वचित एखाद्या वेळी आनंदही होत असेल. पण खाता-खाता मोबाईलमध्ये डोकं खुपसल्यानं मनावर ताण येऊन थकवा येतो. म्हणूनच जेवताना फोनचा वापर टाळावा. पूर्णपणे जेवणावर मन केंद्रित करावं. तरच अन्न शरीराला लागेल.

(वाचा - 'धोनी सैनिक म्हणून सज्ज पण...', लष्कर प्रमुखांचे मोठं वक्तव्य)

जर तुम्ही सतत नैराश्यामध्ये असाल तर ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी धोक्याची घंटा आहे. सततची भीती किंवा चिंता यामुळे नैराश्य येतं. नैराश्यामुळे तुम्हाला पूर्ण वेळ झोप लागत नाही. मग दिवसभर थकवा जाणवत राहतो. असं हे चक्र आहे. त्यामुळे मुळात मनस्वास्थ्य आवश्यक आहे.

जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी कामावर थकवा जाणवू शकतो. याचा अनुभव सर्वांनाच आला असेल. यावर सर्वात चांगला पर्याय म्हणजे रोज रात्री लवकर झोपणं आणि रात्री झोपण्यापूर्वी जाणीवपूर्वक मोबाइल आणि टेलिव्हिजन पाहणं बंद करणं, असं केल्याने तुमची झोप पूर्ण होईल. शांत झोप लागेल.

(हे वाचा - 'या' 4 राशी लगेच पडतात प्रेमात)

ऑफीसमध्ये केवळ एकाच कामाची जबाबदारी नसते. अनेक कामांचा भार डोक्यावर असतोच. त्यामुळे कधीतरी असं होतं की, काही महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या नादात दुसऱ्या कामांकडे दुर्लक्ष होतं. पुढे जाऊन याच रखडलेल्या कामांचा व्याप वाढतो. परिणामी मानसिक आरोग्यावर ताण येतो. याच तणावामुळे तुम्हाला कामाच्या वेळेमध्ये झोप येते. यावर उपाय म्हणजे, कामाचं नियोजन करा. त्यानुसार कामाला वेळ द्या. एक -एक करुन सर्व कामं पूर्ण करावीत. टप्प्या- टप्प्यांमध्ये जास्त काम विभागून करावं. थोडं काम झाल्यावर मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. त्याने पुढील काम करण्यास ऊर्जा मिळेल. कामाची गुणवत्ता अधिक वाढेल. शिवाय तुम्हालाही काम करताना उत्साह वाटेल.

=================================================================================

VIDEO: आझम खान यांच्याविरुद्ध स्मृती इराणी आक्रमक, संसदेत रुद्रावतार

First published: July 27, 2019, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading