उशीरापर्यंत रात्री जागायची सवय आहे तर वेळीच व्हा सावध!

उशीरापर्यंत रात्री जागायची सवय आहे तर वेळीच व्हा सावध!

रात्री उशीरापर्यंत जागणारे लोक अनेकदा पोष्टीक गोष्टी खातच नाहीत. या लोकांमध्ये मद्यपान, गोड पदार्थ, चहा आणि कॉफी पिण्याची सवय सर्वात जास्त असते.

  • Share this:

तुम्हाला रात्री उशीरापर्यंत जागायची सवय आहे का? तुम्हीही त्या लोकांपैकी आहात जे रात्री उशीरापर्यंत जागून मोबाइलवर चॅटिंग किंवा वेबसीरिज पाहता? एका संशोधनानुसार हे सिद्ध झालं आहे की, रात्री उशीरापर्यंत जागणाऱ्या लोकांमध्ये मधुमेह आणि हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो. संशोधनात सांगण्यात आलं आहे की, रात्री उशीरापर्यंत जागणऱ्या लोकांचं दिवसाचं पूर्ण रुटीन खराब होतं. झोप न येण्यामुळे अनेकजण नैराश्यग्रस्त होतात. तसेच रात्री उशीरापर्यंत जागण्याने आहाराचं रुटिनही बदलतं, यामुळे लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे असं जर कोणी तुमच्या घरी असेल त्यांना वेळीच सावध करा.

माणसाचं शरीर 24 तासांच्या हिशोबाने चालतं. आपल्याला कधी खायचं आहे, कधी झोपायचं आहे आणि कधी जागायचं आहे हे सगळं आपलं अवयव ठरवत असतात. अशात जर तुम्ही शरीराला योग्यवेळी खाणं किंवा आराम दिला नाही तर भविष्यात शरीराला अनेक रोगांना सामोरं जावं लागू शकतं.

संशोधकांनुसार, रात्री उशीरापर्यंत जागणारे लोक अनेकदा पोष्टीक गोष्टी खातच नाहीत. या लोकांमध्ये मद्यपान, गोड पदार्थ, चहा आणि कॉफी पिण्याची सवय सर्वात जास्त असते. याशिवाय योग्य वेळी झोपणाऱ्या लोकांच्या सवयी याहून विरुद्ध असतात. त्यांना योग्य वेळी भूक लागते आणि ते कोणत्याही गोष्टीच्या लगेच आहारी जात नाहीत.

जे लोक योग्यवेळी झोपत नाहीत ते वेळेत उठतही नाहीत, त्यामुळे त्यांचा पूर्ण दिवस खराब जातो. अशा लोकांना वयोमानाच्याआधीच मधुमेहासारखे रोग जडतात. याशिवायही अनेक गंभीर आजार होऊ शकतात. उशीरापर्यंत जागणारे सकाळी लवकर उठत नाहीत, त्यामुळे त्यांचा नाश्ता वेळेत होत नाही. या चुकीच्या सवयींमुळे दिवसभराची दिनचर्या बदलते.

जे रात्री उशीरा झोपून सकाळी उशीरा उठतात त्याचा मेंदूच्या हार्मोनवरही परिणाम होतो. संशोधनात हे सांगण्यात आलं आहे की, लोकांच्या मेंदूतील व्हाइट मॅटरवर याचा विपरित परिणाम होतो. विशेष म्हणजे मेंदूच्या त्या भागावर याचा जास्त परिणाम होतो जिथे दुःखाचे भाव तयार होतात. याच कारणामुळे लोक जास्त तणावात असतात.

Loading...

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा....म्हणून बुद्धाने शिष्याला खराब झऱ्यातून पाणी आणायला सांगितलं, ही गोष्ट वाचाच!

डायबेटिस नियंत्रणात राखण्यासाठी करा ही पाच योगासनं!

तुम्हाला विसरण्याची सवय आहे का, मग हे पाच पदार्थ खा!

VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...