काम करताना तुम्हालाही गाणी ऐकायची सवय आहे का, तर जाणून घ्या या गोष्टी

काम करताना तुम्हालाही गाणी ऐकायची सवय आहे का, तर जाणून घ्या या गोष्टी

ऑफिसमध्ये तुमचे डोळे कॉम्प्युटरवर आणि कानात इअरफोन असतात का? काम करताना तुम्हाला गाणी ऐकायला तुम्हाला आवडतं का?

  • Share this:

ऑफिसमध्ये तुमचे डोळे कॉम्प्युटरवर आणि कानात इअरफोन असतात का? काम करताना तुम्हाला गाणी ऐकायला तुम्हाला आवडतं का? अनेकांना काम करताना गाणी ऐकायची आवड असते. ऑफिसमध्ये गाणी ऐकत काम करणं अनेकांना सहज जमतं तर गाणी ऐकत कसं काय कामात लक्ष लागतं असा प्रश्न त्यांच्या आजूबाजूच्यांना पडतो.  गाणी ऐकत काम केल्यामुळे एकाग्रता वाढते असं काहींचं मत आहे तर, काहींच्या मते काम करताना गाणी ऐकल्यास लक्ष विचलीत होतं. अशात गाणी ऐकत काम करण्याचे फायदे आहेत ती नुकसान याबद्दल जाणून घेऊ.

ऑफिसमध्ये गाणी ऐकणं अनेकांना चांगलं वाटतं. अशाने सकारात्मक उर्जा निर्माण होते असं अनेकांचं मत आहे. पण ऑफिसमध्ये तुमचं काम कोणत्या प्रकारचं आहे यावरती या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. नुकतंच नेदरलंडमध्ये केलेल्या एका रिसर्चमध्ये हे सिद्ध झालं आहे की, वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकणाऱ्या व्यक्ती आणि शांत वातावरणात काम करणाऱ्या व्यक्तिशी तुलना केली तर दोघांची विचार करण्याची क्षमता वेगळी असते.

संशोधकांनुसार ज्यांना आनंदी गाणी ऐकायला आवडतात ते जास्त क्रिएटिव्ह असतात. त्यांची विचार करण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त असते. या संशोधनानुसार, जर व्यक्ती कोणत्या गंभीर विचारत असेल किंवा त्याला कोणत्या गोष्टीतून मार्ग काढायचा असेल तर संगीताचा फारसा उपयोग होत नाही. मयामी यूनिव्हर्सिटीत हा रिसर्च करण्यात आला असून, संशोधनानुसार गाणी न ऐकता काम करणाऱ्यांपेक्षा गाणी ऐकत काम करणारे जास्त आयडिया देतात. तसंच काम करताना गाणी ऐकणारे त्यांचा ऑफिसमधील ताण घालवण्यात यशस्वी होतात. त्यामुळे तुम्ही जर काम करताना गाणी ऐकत नसाल तर आजपासून ही आवड सुरू करा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

स्पीकरने संसदेतच मुलाला पाजले दूध, PHOTO VIRAL

लोकांना रात्री ही 7 स्वप्न हमखास पडतात, हे आहेत त्यांचे अर्थ

घरातील प्रदुषण या 6 रोपांमुळे क्षणात जाईल, एकतरी घरी लावाच!

उत्तम सेक्स लाइफसाठी जेवणात या पदार्थांचा समावेश करा!

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 04:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading