Home /News /lifestyle /

Health Tips : जिम सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? पाहा काय सांगतात फिटनेस ट्रेनर

Health Tips : जिम सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? पाहा काय सांगतात फिटनेस ट्रेनर

जिममध्ये जाण्यापूर्वी (Gym Precautions) प्रत्येकाने काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. जर तुम्ही चुकीचा व्यायाम करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

    ,मुंबई 28 जून : आकर्षक शरीर असणं हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. चांगली बॉडी बनवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळतात. ही क्रेझ झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या वयोगटातील लोक जिममध्ये सामील होत आहेत आणि स्वत:ला तंदुरुस्त (Fitness) ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जिममध्ये जाण्यापूर्वी (Gym Precautions) प्रत्येकाने काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. जर तुम्ही चुकीचा व्यायाम करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. जिममध्ये कोणत्या प्रकारची खबरदारी (Safety Tips) घेतली पाहिजे याबद्दल फिटनेस ट्रेनरकडून जाणून घेऊया. फिटनेस ट्रेनर म्हणजे कोण? GFFI फिटनेस अकादमीचे प्रशिक्षक पंकज मेहता म्हणतात की 8 वर्षापासून ते कोणत्याही वयोगटातील लोक जिममध्ये सामील होऊ शकतात. मात्र या सर्वांनी 'क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर'च्या (Qualified Instructor) सूचनेनुसार व्यायाम करावा. जे लोक मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात किंवा इतर वैद्यकीय परिस्थितींनी ग्रस्त आहेत त्यांनी जिममध्ये जाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय अशा लोकांनी 'स्पेशल पॉप्युलेशन ग्रुप'च्या ट्रेनरच्या हाताखालीच जिम करावी. पावसाळा सुरू होताच 'या' आजाराचं संकट; बचावासाठी तात्काळ करा अशा उपाययोजना जिम करताना या गोष्टी लक्षात ठेवा पंकज मेहता यांच्या मते, प्रत्येकाने आरामदायी कपडे घालून जिममध्ये यावे. स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी, सोबत पाण्याची बाटली आणि एनर्जी ड्रिंक ठेवावे. जिममध्ये येण्यापूर्वी जड अन्न खाऊ नये. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास (Gym Tips) होऊ शकतो. एनर्जी ड्रिंक किंवा कोणतेही फळ जिमच्या आधी खाऊ शकता. प्रत्येकाने प्रशिक्षकाच्या बायोकेमिकल तंत्रानुसार (Gym Instructor) व्यायाम केला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. तसे न केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. जे घरी व्यायाम करत आहेत, त्यांनी चालणे आणि धावणे (Walking And Running) यापासून सुरुवात करावी. Health Tips: डायबेटीज असलेले हंगामी फळं खाऊ शकतात का? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितली माहिती निष्काळजीपणा महागात पडू शकतो फिटनेस ट्रेनर्सच्या मते, चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने शरीरातील कनेक्टीव्ह टिश्यू (Breakage Of Connective Tissue) तुटतात. स्नायू ताणले जाऊ शकतात आणि कधीकधी दुखापत होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तुम्ही नेहमी जिम ट्रेनरच्या सूचनेनुसार व्यायाम केला पाहिजे. त्यांच्या मते, जिममध्ये असताना प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात (Protein Rich Food) समावेश करायला हवा. जर तुम्ही सकस आहार घेतला तर व्यायामाचा संपूर्ण परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल. त्यांचं म्हणणं आहे की प्रोटीन पावडरऐवजी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने प्रोटीन मिळवण्याचा प्रयत्न करा. तरीही तुम्हाला प्रोटीन पावडरची गरज असल्यास तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Fitness, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या