व्यायाम करताना महागात पडू शकतात या चुका

रोजच्या कामांमुळे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यातही वेळ मिळाला तर आपल्या शरीराचं दुखणं आपल्याला साथ देत नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 08:23 PM IST

व्यायाम करताना महागात पडू शकतात या चुका

बदलत्या लाइफस्टाइलमध्ये शरीराला फिट ठेवणंही तितकच महत्त्वाचं आहे. पण आपल्या रोजच्या कामांमुळे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यातही वेळ मिळाला तर आपल्या शरीराचं दुखणं आपल्याला साथ देत नाही.

बदलत्या लाइफस्टाइलमध्ये शरीराला फिट ठेवणंही तितकच महत्त्वाचं आहे. पण आपल्या रोजच्या कामांमुळे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यातही वेळ मिळाला तर आपल्या शरीराचं दुखणं आपल्याला साथ देत नाही.

जर तुम्हीही या समस्यांनी त्रासलेले आसाल, तर व्यायाम करण्यासाठी आणि तुमची व्यायामाची क्षमता वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स.

जर तुम्हीही या समस्यांनी त्रासलेले आसाल, तर व्यायाम करण्यासाठी आणि तुमची व्यायामाची क्षमता वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स.

व्यायाम करताना शरीरावर जास्त जोर देऊ नये व्यायामाच्या सुरुवातीला शरीरावर जोर दिला तर त्याने शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हळू-हळू तुमची व्यायामाची क्षमता वाढवा, त्याने सहनशक्ती वाढेल आणि शरीराच्या दुखण्यापासूनही वाचाल.

व्यायाम करताना शरीरावर जास्त जोर देऊ नये
व्यायामाच्या सुरुवातीला शरीरावर जोर दिला तर त्याने शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हळू-हळू तुमची व्यायामाची क्षमता वाढवा, त्याने सहनशक्ती वाढेल आणि शरीराच्या दुखण्यापासूनही वाचाल.

व्यायाम करण्याआधी वॉर्मअप करणं अतिशय महत्त्वाचं व्यायामाआधी वॉर्मअप शरीरात उब निर्माण करते ज्याने शरीराची क्षमता वाढते. तुम्ही जर नियमित व्यायाम करत असालं तर व्यायामाआधी 10 मिनिटं व्यायाम करायला विसरू नका.

व्यायाम करण्याआधी वॉर्मअप करणं अतिशय महत्त्वाचं
व्यायामाआधी वॉर्मअप शरीरात उब निर्माण करते ज्याने शरीराची क्षमता वाढते. तुम्ही जर नियमित व्यायाम करत असालं तर व्यायामाआधी 10 मिनिटं व्यायाम करायला विसरू नका.

व्यायाम करताना योग्य कपडे घालणे बऱ्याच वेळेस आपण कोणत्याही कपड्यावर व्यायाम करतो पण ते शरीराला त्रासदायक आहे. व्यायाम करताना आरामदायक कपडे आणि पायात बूट घालणं हे खुप महत्त्वाचं आहे.

व्यायाम करताना योग्य कपडे घालणे
बऱ्याच वेळेस आपण कोणत्याही कपड्यावर व्यायाम करतो पण ते शरीराला त्रासदायक आहे. व्यायाम करताना आरामदायक कपडे आणि पायात बूट घालणं हे खुप महत्त्वाचं आहे.

Loading...

व्यायाम करताना काही वेळ विश्रांती घेणं ही गरजेच आहे. व्यायाम करताना थोडीशी विश्रांती घेतल्याने शरीरातील थकवा दूर होतो आणि त्याने आणखी व्यायाम करण्यास ऊर्जा मिळते.

व्यायाम करताना काही वेळ विश्रांती घेणं ही गरजेच आहे.
व्यायाम करताना थोडीशी विश्रांती घेतल्याने शरीरातील थकवा दूर होतो आणि त्याने आणखी व्यायाम करण्यास ऊर्जा मिळते.

पौष्टिक आहार करणे शरीराची क्षमता वाढवण्यासाठी रोज योग्य प्रमाणात आपण पौष्टिक आहार करणं महत्त्वाचं आहे, आणि सगळ्यात आवश्यक म्हणजे तेलकट-तुपकट आणि जंक फूड खाणं शक्यतो टाळा.

पौष्टिक आहार करणे
शरीराची क्षमता वाढवण्यासाठी रोज योग्य प्रमाणात आपण पौष्टिक आहार करणं महत्त्वाचं आहे, आणि सगळ्यात आवश्यक म्हणजे तेलकट-तुपकट आणि जंक फूड खाणं शक्यतो टाळा.

आपल्या रोजच्या व्यायामाच्या कामगिरीवर नजर असूद्या रोज आपण किती व्यायाम करतो यावर नजर ठेवा. याने स्वतःला सुधारण्यास मदत होईल.

आपल्या रोजच्या व्यायामाच्या कामगिरीवर नजर असूद्या
रोज आपण किती व्यायाम करतो यावर नजर ठेवा. याने स्वतःला सुधारण्यास मदत होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...