• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Gut Health : आतड्यांमध्ये बिघाड झाल्याची ही असतात महत्त्वाची लक्षणं, वेळीच घ्या काळजी

Gut Health : आतड्यांमध्ये बिघाड झाल्याची ही असतात महत्त्वाची लक्षणं, वेळीच घ्या काळजी

आतड्यांचे आरोग्य बिघडल्याचा अंदाज शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून केला जाऊ शकतो. आतड्यांसंबंधी अस्वस्थतेच्या या लक्षणांकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये अन्यथा ते पाचन किंवा पोटाच्या समस्या वाढू शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : आतड्यांमधील खराबी (Gut health) आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करू शकते. अनियमित जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी कधीकधी आतड्यांसाठी समस्या बनतात. परंतु, बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपली ही चूक पाचन संबंधित समस्यांचे कारण बनते. सुप्रसिद्ध पोषणतज्ञ मीनाक्षी पेटुकोला यांनी नुकत्याच एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये आतड्यांच्या आजारांसंबधी चार महत्त्वाची लक्षणं सांगितली आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की, आतड्यांचे आरोग्य बिघडल्याचा अंदाज शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून केला जाऊ शकतो. आतड्यांसंबंधी अस्वस्थतेच्या या लक्षणांकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये अन्यथा ते पाचन किंवा पोटाच्या समस्या वाढू शकतात. सूज येणे किंवा गॅस - जेव्हा आतड्यांमध्ये खराब बॅक्टेरियाचे प्रमाण खूप वाढते, तेव्हा आपली पाचन प्रणाली सामान्य राहत नाही. त्यामुळे पोटात गॅस किंवा अॅसिडिटीचा त्रास वाढतो. पोषणतज्ज्ञ म्हणतात की पौष्टिक अन्न खाणे, जेवताना खाण्याकडं लक्ष देणं आणि अन्न व्यवस्थित चघळणं पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. हे वाचा - टायरमध्ये अडकलं हत्तीचं पिल्लू, आईने केली सुटका; पाहा SUPER CUTE VIDEO मूड स्विंग - तुम्हाला माहीत आहे का की, आपले पाचन आरोग्य आणि तुमच्या मूडचा किंवा रागाचा संबंध आहे. चांगली झोप, ताजे अन्न आणि ताण-तणावाचे व्यवस्थापन हे आपल्या आतडे आणि हृदय दोन्हीसाठी चांगले सिद्ध होते.
  एकाग्रतेची कमतरता - जर तुमची पाचक संस्थाच बिघडली असेल तर एकाग्रता कमी होणे किंवा मानसिक नैराश्यासारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. अशा मानसिक समस्या आतड्यांमधील बिघाडाचे लक्षण असू शकतात. हे वाचा - Shocking! कुटुंबातील 5 जणांची सामूहिक आत्महत्या; 2 महिन्यांपूर्वी पत्नीचा black fungusने झाला होता मृत्यू त्वचेतील समस्या - कोणत्याही प्रकारच्या आतड्यांसंबंधी समस्येचा परिणाम जसे जळजळ, आतड्यात छिद्र किंवा पचन समस्या प्रथम आपल्या त्वचेवर दिसून येते. त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा भाग आहे. शरीरातील कोणत्याही समस्येचा परिणाम प्रथम त्याच्यावर दिसून येतो. आपली निरोगी चमकणारी त्वचा ही आतड्यांच्या चांगल्या आरोग्याचा किंवा आपल्या निरोगी जीवनशैलीचा परिणाम आहे.
  Published by:News18 Desk
  First published: