गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहण : थोड्याच वेळात आहे दुर्मीळ योग, जाणून घ्या ग्रहणाबद्दल सर्व काही

गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहण : थोड्याच वेळात आहे दुर्मीळ योग, जाणून घ्या ग्रहणाबद्दल सर्व काही

यावर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. बरोबर 149 वर्षांपूर्वी असा योग आला होता. किती वाजता लागणार ग्रहण, महाराष्ट्रात दिसणार का?

  • Share this:

मुंबई 16 जुलै :  आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हटलं जातं. आपल्याकडे या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. बरोबर 149 वर्षांपूर्वी आषाढ पौर्णिमेला चंद्रग्रहणाचा योग आला होता. आता एवढ्या वर्षांनंतर पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या रात्री ग्रहण होत आहे.

17 तारखेला पहाटे दिसणारं हे ग्रहण भारतातून दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. चंद्राचा निम्म्याहून अधिक भाग झाकला जाईल. 16 जुलैला आषाढ पौर्णिमा आहे. या दिवशी व्यासपूजा केली जाते. शिक्षक, गुरुस्थानी असलेल्या व्यक्ती यांचे ऋण व्यक्त करायचा हा दिवस. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या वेळी गुरुपौर्णिमेच्या रात्रीच चंद्रग्रहण आहे. या ग्रहणामुळे व्यासपूजेत काहीही अडथळा येणार नाही. यासंदर्भात अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नयेत.

किती वाजता दिसणार ग्रहण?

पौर्णिमेच्या रात्री होणारं हे खंडग्रास चंद्रग्रहण भारताच्या सर्व भागातून दिसू शकेल. अरुणाचल प्रदेशातला पर्वतीय भाग वगळला तर चंद्रोदयाच्या वेळेनंतरच ग्रहणकाळाला सुरुवात होत असल्याने सगळ्या ठिकाणांहून चंद्रग्रहण दिसेल.

हेसुद्धा वाचा : ऑफिसमध्ये राहता येणार नाही 'सोशल', सरकारने लागू केले नियम

मंगळवारी मध्यरात्रीनंतर ग्रहणवेध लागतील आणि पहाटे ग्रहण पूर्ण सुटेल. NASA ने दिलेल्या माहितीनुसार हे चंद्रग्रहण आशिया, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या खंडांमधून दिसणार आहे. ग्रहणकाळ 1843GMT म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 12 वाजून 15 मिनिटांपासून सुरू होईल. साधारण पहाटे 3 वाजता ग्रहणमध्य होईल. या वेळी चंद्राचा सर्वाधिक भाग झाकलेला दिसेल. हे खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. पहाटे 4 वाजून 29 मिनिटांपर्यंत ग्रहण असेल.

हेसुद्धा वाचा : 50 धावा केल्यानंतर गोलंदाजी करताना त्याच्या छातीत दुखू लागलं आणि...

यानंतर होणारं खग्रास चंद्रग्रहण 26 मे 2021 रोजी होणार आहे.

महाराष्ट्रात दिसणार?

भारताच्या जवळपास सर्व भागातून हे ग्रहण दिसणार असलं, तरी महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मंगळवारी रात्री ढगाळ हवामान असण्याची शक्यता आहे. मराठवाड्याचा काही भाग वगळला तर आकाश निरभ्र असण्याची शक्यता नाही. त्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण नुसत्या डोळ्यांना दिसणं अवघड आहे. काही काळासाठी ढगांची चादर दूर झाली तर पहाटे पृथ्वीच्या सावलीने झाकला गेलेला चंद्र दिसू शकेल. नुसत्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहायला हरकत नाही. ते सुरक्षित आहे.

-----------------

VIDEO: पुढील 5 दिवस कसा पडणार पाऊस, पाहा तुमच्या शहरातले MONSOON अपडेट

First published: July 16, 2019, 9:00 PM IST

ताज्या बातम्या