Kamalam: अमेरिकन फळाचं संस्कृत नाव ठेवण्यामागचं कारण काय? वाचा या फळाविषयी

Kamalam: अमेरिकन फळाचं संस्कृत नाव ठेवण्यामागचं कारण काय? वाचा या फळाविषयी

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यात महत्वपूर्ण ठरणारे ड्रॅगन फ्रुट (Dragaon Fruit) या फळाचे नाते व्हिएतनामशी (Vietnam) जोडले गेले आहे. या फळाची आता भारतात मात्र सर्वाधिक चर्चा रंगली आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 23 जानेवारी:  रोगप्रतिकारकशक्ती (Immunity Booster) वाढवण्यात महत्वपूर्ण ठरणारे ड्रॅगन फ्रुट (Dragaon Fruit) या फळाचे विशेष नाते व्हिएतनामशी (Vietnam) जोडले गेले आहे. परंतु या फळाच्या नावामुळे ते चीनमधील (China) फळ असावे असा समज लोकांमध्ये आहे. परंतु, हे वास्तव नाही.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्या म्हणण्यानुसार ड्रॅगन फ्रुटचे भारतामध्ये नामकरण कमलम (Kamalam)  व्हावे. कारण अमेरिकी नाव हे योग्य वाटत नाही.  हे फळ पाहताच कमळ फूलाची आठवण येते. दक्षिण-मध्य अमेरिकेत आढळून येणाऱ्या वन्य कॅक्टस जातीच्या या फळाला अमेरिकी पिटाया (Pitaya) असेही संबोधले जाते. आता भारतात या फळाचे नाव बदलण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत, ही बाब नक्कीच रंजक आहे. त्यामुळे यामागील कारणे पाहणे औत्सुक्याचे ठरु शकते.

जसे किवी फळ (Kiwi Fruit) असते, त्याचप्रमाणे काहीसे ड्रॅगनफ्रूट आहे. केवळ त्याचा रंग वेगळा आहे. किवी हे आतून हिरवे असते, तसं ड्रॅगन फ्रुट आतून पांढरे किंवा लाल रंगाचे  असते. तसंच पिवळ्या रंगामध्येही हे फळ आढळीन येते, परंतु त्याचं प्रमाण फार कमी आहे. व्हिएतनाम हा या फळाचा प्रमुख निर्यातदार देश आहे. 19 व्या शतकापासून व्हिएतनाममध्ये या फळाला थान्ह लोंग असं म्हटलं जातं. याचा अर्थ ड्रॅगन आय होतो. त्यापासून ड्रॅगन फ्रुट असे इंग्रजी नाव प्रचलित झाले आहे.

या फळाचे उत्पादन कसे होते आणि त्याचे सेवन कसे केले जाते?

लॅटिन अमेरिकेतही (Latin America) या फळाचे उत्पादन होते. तसेच थायलंड, तैवान, चीन आस्ट्रेलिया, इस्त्राईल, श्रीलंका आणि भारतातही याचे उत्पादन घेतले जाते. 1990 च्या दशकापासून भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, ओडीशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि अंदमानमध्ये याचे उत्पादन सुरु झाले. कोरडवाहू जमीन यासाठी उपयुक्त ठरते. हे फळ मधोमध कापून आपण थेट सेवन करु शकतो किंवा फळाचे काठ आणि साल सोलून आतील पांढरा गर खाता येतो. ड्रॅगन फ्रुटचे शेक देखील आवडीने सेवन केले जाते. सॅलड, केकमध्येही याचा वापर केला जातो.

कसे आरोग्यदायी आहे हे फळ?

आरोग्यासाठी हे फळ महत्वपूर्ण मानले जाते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबतच या फळात अँटीआक्सिडंट (Antioxidant) आणि फायबर (Fiber) मुबलक असते. या फळाच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल आटोक्यात येते. व्हिटॅमिन सी आणि खनिज असल्याने या फळास सुपरफूड मानले जाते. या फळाच्या सेवनाने मनाला आनंद मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सेरोटाॅनिन या रसायनाची निर्मिती होते.

या फळाचे नाव बदलण्याचे कारण काय?

या फळाच्या नाव बदलण्यामागे अशी कहाणी आहे की, 26 जुलै 2020 रोजी मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुजरातमधील कच्छतील ड्रॅगनफ्रुट उत्पादक शेतकऱ्यांचे विशेष कौतुक केले होते. या शेतकऱ्यांनी या फळाच्या उत्पादनासाठी वापरलेल्या देशी उत्पादन पध्दतीचा आणि या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेल्या पावलांचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी भाषणात केला होता. यानंतर 6 आगस्टला गुजरात वन विभागाने या फळाचे नाव बदलून कमलम करावे असा प्रस्ताव भारतीय कृषी संशोधन परिषदेला पाठवला.

(हे वाचा-एकेकाळी प्रचंड पाणीटंचाई असलेल्या या प्रांतात आज पिकतेय लालबुंद स्ट्रॉबेरी शेती)

या फळाचे नाव बदलल्याने त्याची प्रसिध्दी आणखी वाढेल, आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत याचे उत्पादन वाढवण्यासाठी संधी उपलब्ध होतील, असे या प्रस्तावात म्हटलं होतं. मात्र या नामकरण बदल प्रक्रियेला अजूनही काही पैली आहेत का हा प्रश्न कायम राहतो.

भाजपसोबत काय आहे कनेक्शन?

कमळ हे भाजपचे (Bjp) निवडणूक चिन्ह आहे. गांधीनगरमधील कोबा येथील भाजप मुख्यालयाचे नाव देखील 'कमलम' आहे. हा केवळ योगायोग आहे की काही ताळमेळ घालण्याचा प्रयत्न आहे? यावर स्पष्टीकरण देताना रुपाणी म्हणाले, की जगभरात या फळाला ड्रॅगन फ्रुट नावाने ओळखले जाते. परंतु या नावामुळे लोकांना हे फळ चीनी आहे, असा समज आहे. गुजरात सरकार या फळाचे नाव बदलून कमलम ठेवू इच्छिते कारण या फळाचा आकार कमळाच्या फूलासारखा दिसतो. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर मात्र चर्चांना उधाण आलं आहे.काहीही आवश्यकता नसताना गुजरात सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी टीका केली जात आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील तयार करण्यात आले आहेत.

दुसरीकडे हा नाव बदलण्याचा प्रस्ताव कृषी मंत्रालयाकडे पाठवला असल्याचे आयसीएआरने (ICAR) म्हटले आहे. या प्रस्तावाला प्रथम बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाची मंजुरी आवश्यक आहे. ड्रॅगन फ्रूट हे भारतीय फळ नाही, त्यामुळे त्याच्या नामकरणापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदेशीर पैलू देखील पाहवे लागतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 23, 2021, 7:34 AM IST
Tags: Gujrat

ताज्या बातम्या