Guinness World Records 2020: गिनीज बुकमध्ये तिरंग्याचा दबदबा; 80हून अधिक भन्नाट रिकॉर्ड भारतीयांच्या नावावर!

Guinness World Records 2020: गिनीज बुकमध्ये तिरंग्याचा दबदबा; 80हून अधिक भन्नाट रिकॉर्ड भारतीयांच्या नावावर!

या पुस्तकात असेही काही रेकॉर्ड आहेत ज्याबद्दल अभिमान वाटण्याऐवजी लाजच वाटेल.

  • Share this:

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नवीन आवृत्तीत भारतीयांनी एकूण 80 रेकॉर्डवर आपलं नाव कोरलं आहे. यात सर्वात लांब केसांपासून ते सर्वात कमी उंचीची महिला आणि कागदांच्या कपचं सर्वात जास्त कलेक्शन अशा अनेक रेकॉर्डचा समावेश आहे. प्रकाशक पेंगुइन रँडम हाउस यांनी गुरुवारी याची घोषणा केली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 2020 च्या नवीन पुस्तकात हजारो नव्या रेकॉर्डचा समावेश करण्यात आला आहे.

नागपुरच्या ज्योती अमागेची उंची आहे 24.7 इंच

सर्वात लांब केसांसाठी भारताच्या 16 वर्षीय निलांशी पटेलचं नाव या रेकॉर्ड बुकमध्ये आलं. तिच्या केसांची लांबी पाच फूट सात इंच एवढी आहे. तर दुसरीकडे नागपूरमधील ज्योती अमागेची उंची फक्त 24.7 इंच एवढीच आहे. सर्वात कमी उंचीची जिवीत मुलगी हा रेकॉर्ड ज्योतीच्या नावावर झाला. तसेच पुणे शहरातील श्रीधर चिल्लर यांच्या डाव्या हातावर सर्वात मोठं नख आहे. या नखाची लांबी 909.6(358.1 इंच) सेंटीमीटर एवढी आहे.

जगातील सर्वात प्रदुषित शहर कानपूर

तमिळनाडू येथील के.वी. शंकरनारायणन यांच्या नावावर सर्वाधिक कागदाचे कप संग्रहित करण्याचा रेकॉर्ड आहे. त्यांच्याकडे एकूण 736 कप आहेत. या पुस्तकात असेही काही रेकॉर्ड आहेत ज्याबद्दल अभिमान वाटण्याऐवजी लाजच वाटेल. यात जगातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून कानपूरचं नाव आहे. 2016 मध्ये पीएम 2.5 ची सरासरी 3, 173 मायक्रोग्रॅम एवढी होती. जागतिक आरोग्य संघटनेनुसार हा आकडा 17 पटीने जास्त आहे.

जगातील सर्वात जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या टॉप 5 कंपन्या, भारतातील या कंपनीचंही नाव

जाऊ तिथं कचरा करू; अमेरिकेत दिवाळीला रस्त्यावर उडवले फटाके, आणि...

डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही; 'या' उपायांनी दूर होईल घशातील खवखव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 02:41 PM IST

ताज्या बातम्या