मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Gudi Padwa 2023 : मुंबईकर महिलेनं तयार केली मराठी दिनदर्शिका, पाहा कसं आहे 13 महिन्यांचं कॅलेंडर, Video

Gudi Padwa 2023 : मुंबईकर महिलेनं तयार केली मराठी दिनदर्शिका, पाहा कसं आहे 13 महिन्यांचं कॅलेंडर, Video

X
मुंबईकर

मुंबईकर महिलेनं मराठी नववर्षाच्या निमित्तानं खास कॅलेंडर तयार केलंय. विशेष म्हणजे हे कॅलेंडर 13 महिन्यांचं आहे.

मुंबईकर महिलेनं मराठी नववर्षाच्या निमित्तानं खास कॅलेंडर तयार केलंय. विशेष म्हणजे हे कॅलेंडर 13 महिन्यांचं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नुपूर पाटील, प्रतिनिधी

    मुंबई, 17 मार्च : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचं महाराष्ट्रात मोठं महत्त्व आहे. मराठी नववर्ष देखील पाडव्याच्या दिवशी सुरू होतं. इंग्रजी नववर्ष सुरु होताना दरवर्षी हजारो कॅलेंडर बाजारात येतात. आरती जाधव या  मुंबईकर महिलेनं मराठी नववर्षाच्या निमित्तानं खास कॅलेंडर तयार केलंय. विशेष म्हणजे यंदा अधिक महिना असल्यानं हे कॅलेंडर बारा नाही तर तेरा महिन्यांचं आहे.

    कशी सुचली कल्पना?

    मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अनेकजण आपल्या पद्धतीनं प्रयत्नशील असतात. आरती यांना लिखानाची आवड आहे. त्याचबरोबर त्यांना विविध कला अवगत आहेत.  त्यांची कन्या गौरी जाधव देखील कॉशच्यूम डिझायनल आहेत. आरती यांना दीड महिन्यापूर्वी मराठी दिनदर्शिका तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी तिथी प्रमाणे ही दिनदर्शिका तयार केली आहे.

    चैत्र ते फाल्गून या मराठी महिन्यांची ही दिनदर्शिका आहे. रोजच्या वापरातील कॅलेंडरप्रमाणेच ही दिनदर्शिका तयार करण्यात आलीय. पण, याला खास मराठी टच दिला आहे. आरती यांनी यामध्ये महिन्याशी सुसंगत अशी फोटोग्राफी आणि चारोळ्याचा वापर केला आहे.

    नऊवारी नेसून मराठमोळ्या पद्धतीनं साजरा करा पाडवा, पाहा तुम्हाला कोणती साडी आवडतेय? Video

    काय आहे किंमत?

    गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही दिनदर्शिका प्रकाशित होणार आहे. या दिनदर्शिकेत सर्व सण आणि तिथी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत 200 रुपये आहे. मराठी सण उत्सव, विविध तिथी हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, इंग्रजी माध्यमामुळे तर लहान मुलांना ते कळतंही नाही. या गोष्टी घराघरात पोहोचव्या अशी माझी इच्छा आहे असं आरती जाधव यांनी सांगितलं.

    गौरीनं या कॅलेंडरच्या फोटोजमध्ये मॉडेल म्हणून काम केलं आहे. हा एक नवीन प्रयोग आहे. याच दिनदर्शिकेचं काम करताना मजा आली. ती पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचं वेगळेपण जाणवेल.महाराष्ट्राच्या बाहेरही हे कॅलेंडर कुणाला हवं असेल तर ते पोहचवण्याची सुविधा आहे, अशी माहिती गौरीनं दिली.

    नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उभारा आकर्षक गुढी, पाहा काय आहे बाजारातील ट्रेन्ड, Video

    दिनदर्शिकेसाठी संपर्क 

    आरती जाधव - 9967303445

    गौरी जाधव - 95942 22207

    First published:
    top videos

      Tags: Gudi Padwa 2023, Lifestyle, Local18, Mumbai