मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मास्क की No mask, Local प्रवासाचं काय, Gudi padwa कसा साजरा करायचा?; सर्व प्रश्नांची उत्तरं इथं पाहा

मास्क की No mask, Local प्रवासाचं काय, Gudi padwa कसा साजरा करायचा?; सर्व प्रश्नांची उत्तरं इथं पाहा

गुढीपाडव्याआधी (Gudi padwa 2022) महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत (Maharashtra new corona guidelines).

गुढीपाडव्याआधी (Gudi padwa 2022) महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत (Maharashtra new corona guidelines).

गुढीपाडव्याआधी (Gudi padwa 2022) महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत (Maharashtra new corona guidelines).

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 31 मार्च : गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा (Coronavirus) यशस्वीरित्या मुकाबला केला. कोरोना नियमांमध्ये जखडून राहिलो. मास्कमध्ये कोंडून राहिलो. या सर्वातून कधी सुटका होणार याची प्रतीक्षा सर्वांना होती. आता नववर्ष येत आहे. या वर्षात काय वाढून ठेवलं आहे काय माहिती, असंच सर्वांना वाटत होतं. अशात आता ठाकरे सरकारने गुढीपाडव्याआधी (Gudi padwa 2022) कोरोनाचे नवे नियम जारी केले आहेत. खरंतर सरकारने कोरोनाच्या सर्व निर्बंधांतून सुटका केली आहे (Maharashtra new corona guidelines).

आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केलं. आता सर्व निर्बंध उठवले म्हणजे नेमकं काय? नेमकं सरकारने काय निर्णय घेतले आहेत पाहुयात.

मास्क वापरायचा की नाही? (In Maharashtra mask not mandatory)

आतापर्यंत कोरोनाच्या नियमात बरेच बदल झाले. कधी नियम कठोर करण्यात आले तर कधी शिथील करण्यात आले. पण यातून एक गोष्ट बंधनकारक होती ती म्हणजे मास्क. मास्क हा कायम बंधनकारक राहिला. पण आता अखेर या मास्कपासून सर्वांची सुटका झाली आहे. सार्वजनिक ठिकाणं, मॉल, गार्डन याठिकाणी मास्क लावण्याची गरज नाही.  मास्क वापरणं बंधनकारक नाही तर ऐच्छिक असेल.

लोकल प्रवासासाठी लशीचं प्रमाणपत्र दाखवायचं की नाही? (No need of corona vaccination certificate during  local travelling)

लोकलने प्रवास करण्यावरही काही बंधनं होती. आतापर्यंत लोकल प्रवासासाठी कोरोना लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक होतं. जे कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच मिळत होतं आणि ते लोकल तिकीट घेण्यासाठी दाखवावं लागत होते. पण आता बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. मॉल, गार्डन आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही प्रमाणपत्र दाखवावं लागणार नाही.

हे वाचा - Gudi Padwa 2022: 'गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे पण...' मुख्यमंत्र्यांनी केलं महत्त्वाचं आवाहन

सण-उत्सव कसे साजरे करायचे? (Corona guideline for gudi padwa festival celebration)

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती. राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे. सर्व धर्मांचे सण-उत्सव धूमधडाक्यात साजरे होतील. यात्रा-जत्रेलाही परवानगी. त्यामुळे आता येणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा उत्साहात, आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लग्नकार्य, इतर कार्यक्रमांसाठी काय नियम? (Corona guidelines for marriage)

कोरोना काळातही लग्न झाली. पण कुणी ऑनलाइन तर कुणी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडला. लग्नकार्यात माणसांच्या संख्यांना मर्यादा होती पण आता ती मर्यादाही नाही.  सोशल डिस्टन्सिंगचीही गरज नाही. त्यामळे लग्नकार्य आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थितीतांच्या संख्येवर बंधनं नाहीत.

हे वाचा - गुढीपाडव्यापूर्वी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारने दिलं मोठं गिफ्ट, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली घोषणा

मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंचं आवाहन

मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra News