आता डाय, मेहंदीशिवाय घरबसल्या काही मिनिटात काळे करा केस

आता डाय, मेहंदीशिवाय घरबसल्या काही मिनिटात काळे करा केस

पांढरे केस काळे करण्यासाठी आता बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त डायची गरज नाही. घरच्या घरी तुम्ही असा हेअर पॅक बनवू शकता, ज्यामुळे तुमचे केस फक्त काळेभोरच नाही, तर मुलायम आणि चमकदारही होतील

  • Share this:

मुंबई : आरशात पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यावर पांढरा केस दिसताच, तो काळा करण्यासाठी तुमची धडपड सुरू होते. मेहंदी, Hair dye ... काय काय नाही लावत तुम्ही केसांना... मात्र यातील केमिकल्समुळे तुमच्या केसांना हानी पोहोचू शकते. मात्र टेन्शन नका घेऊ, अगदी घरच्या घरी तुमचा तुम्ही स्वत:चा सुरक्षित आणि केमिकलविरहित असा हेअर पॅक बनवू शकता, ज्यामुळे तुमचे Grey hair फक्त काळेभोरच नाही, तर मुलायम आणि चमकदारही होतील. चला तर मग आता हा Hair pack नेमका बनवायचा कसा ते पाहू.

हेअर पॅकसाठी सामग्री

लोखंडी भांडं

2 चमचा काथा पावडर

2 चमचा आवळा पावडर

2 चमचा चहा पावडर

4 ते 5 लवंगा

अर्धा ग्लास पाणी

सामग्री आणि पाण्याचं प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवू शकता.

कसा बनवाल हेअर पॅक?

  • लोखंडाच्या भांड्यात पाणी गरम करा, पाणी जास्त उकळू नका. मात्र इतकं गरम करा की त्यात पावडर मिसळली जाईल.
  • पाणी गरम झाल्यानंतर त्यात 2 चमचे चहा पावडर टाका. केसांना रंग देण्यासाठी चहापावडर उपयुक्त आहे. यामध्ये निकोटेनिक अॅसिड असतं, ज्यामुळे केसांना काळा रंग येतो. चहा पावडर ऐवजी तुम्ही चहापावडर घातलेलं पाणीही वापरू शकता.
  • आता या पाण्यात आवळा पावडर टाका आणि 5 ते 6 मिनिटं उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यात 4 ते 5 लवंगा टाका, हळूहळू पाण्याचा रंग बदलेल
  • आता गॅस बंद करून हे भांड गॅसवरून खाली उतरून घ्या आणि मिश्रण थोडं थंड होऊ द्या. त्यानंतर मिश्रण गाळून घ्या, जेणेकरून त्यातील चहापावडर, आवळा आणि लवंगाचे कण निघून जातील
  • आता पुन्हा हे मिश्रण लोखंडाच्या भांड्यात उकळून घ्या. आता यामध्ये काथा पावडर टाका आणि एकत्र करा.
  • मिश्रण जास्त पातळ नाही, तर थोडं जाडसर असायला हवं.

ऑप्शनल सामग्री

हा हेअर पॅक थोडा जाडसर करण्यासाठी तुम्ही यामध्ये मेहंदी टाकू शकता, मात्र एक-दोन चमच्यांपेक्षा जास्त नसावी.

जर केस राठ असतील, तर त्यामध्ये व्हिटॅमिन E कॅप्सुलही टाकू शकता, मात्र एक ते दोन त्यापेक्षा जास्त नाही.

तुम्हाला हवं तेव्हा हा पॅक तुम्ही लगेच केसांवर लावू शकता. नाहीतर रात्रभर लोखंडाच्या भांड्यात ठेवून सकाळी केसांवर लावा.

तेलकट किंवा न धुतलेल्या केसांवर शक्यतो हा पॅक लावू नका कारण त्याचा परिणाम कमी होतो. जर धुतलेल्या केसांवर हा हेअर पॅक लावला तर त्याचा परिणाम जास्त दिसून येईल.

हेअर पॅक लावल्यानंतर केसांवर शॉवर पॅक जरूर लावा.

केस धुतल्यानंतर तुम्हाला फरक नक्कीच दिसून येईल.

अन्य बातम्या

महागडे शँपू नाही; या 5 घरगुती गोष्टी ठेवतील तुमचे केस डँड्रफपासून मुक्त

कोंड्यामुळे डोकं खाजवून झालात बेजार तर करून पाहा 'हा' घरगुती उपाय

First published: January 24, 2020, 10:13 AM IST

ताज्या बातम्या