मुंबई, 7 फेब्रुवारी : भारतात चहाप्रेमींची कमी नाही. मात्र हल्ली लोक आपल्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष देत आहेत. म्हणून बरेच साधारण चहा घेण्याऐवजी पौष्टिक ग्रीन टी घेणे पसंत करतात. ग्रीन टीमध्ये असलेल्या आरोग्य फायद्यांमुळे लोकांचा याकडे कल वाढला आहे. वजन कमी करण्यापासून ते खूप थकल्यानंतर नसांना आराम देण्यासाठी लोक अनेकदा ग्रीन टीचा वापर करतात. हेल्थ एक्सपर्टदेखील अनेक समस्या दूर करण्यासाठी ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात.
ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी तर फायदेशीर असते. मात्र तुम्हाला माहित आहे का? ग्रीन टीमध्ये काही खास पदार्थ घातल्यास त्याचे गुणधर्म खूप वाढतात. अशाप्रकारे ग्रीन टी प्यायल्यास कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांपासून तुमचे रक्षण होते. चला तर पाहुयात ते पदार्थ कोणते आहेत. झी न्यिज हिंदीने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
हे पदार्थ खाऊ घातले तर चिडायचं सोडा बायको प्रेमाचा वर्षाव करेल
लिंबू घातलेली ग्रीन टी
ग्रीन टी पिणे फायदेशीर असते हे तर सर्वानाच माहित आहे. मात्र त्याच्या कडू चवीमुळे लोक पिणे टाळतात. ग्रीन टीमध्ये लिंबू मिसळल्यास त्याची कडू चव थोडीशी कमी होते. हे अँटीऑक्सिडेंट्स वाढवण्यास देखील मदत करते. मात्र तुम्हाला जास्त परिणाम हवा असेल तर ग्रीन टीमध्ये शेवटी लिंबाचा रस मिसळा.
आलं घातलेली ग्रीन टी
रोजच्या जेवणात आपण लायचा वापर कारण यामुळे जेवणाला छान चव येते. मात्र ग्रीन टीमध्ये आलं घालून प्यायल्याने आरोग्याला अनेक प्राकारे फायदा होऊ शकतो. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. सोबतच कॅन्सरसारख्या घातक आजारांपासूनही बचाव होतो.
पुदिन्याची पाने, दालचिनी घातलेली ग्रीन टी
ग्रीन टीबनवताना त्यामध्ये पुदिन्याची पाने आणि दालचिनी घटल्यानेही शरीराला फायदा होतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनदेखील सुधारते. हा चहा प्यायल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही जास्तीचे खाणे टाळता आणि परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.
स्टीव्हियाची पानं घातलेली ग्रीन टी
स्टीव्हिया हा गोडाचा एक सुरक्षित पर्याय आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम असतात. हे ग्रीन टीला गोडपणा देते. ग्रीन टी नियमित प्यायल्याने कॅलरीज तर कमी होण्यासोबतच रक्तातील साखरेची पातळीही कमी होते. त्यामुळे बऱ्याचदा मधुमेही रुग्णांना अशाच प्रकारे ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो.
कमी वयात मासिक पाळी बंद करण्याकडे वाढतोय मुलींचा कल! पाहा कोणती आहे ही ट्रीटमेंट
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Tea