अथेन्स, 26 ऑक्टोबर : मायक्रो चोरिओ...ग्रीसमधील टिलोस बेटावर असलेलं एक छोटं गाव. हे गाव 1930 मध्ये टिलोसची राजधानी होतं. 1200 लोक या गावात रहात होतं. पण हळूहळू लोक हे गाव सोडून गेले, पूर्ण गाव ओसाड झालं. हे गाव घोस्ट व्हिलेज बनलं. आज तिथं पुन्हा लोकांना आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
पेलोपोनइसमधील गिऑर्गोस अलिफेरिस 1980 मध्ये आपल्या डॉक्टर भावासह या ठिकाणी आला. तेव्हा त्याने मायक्रो चोरिओ हे घोस्ट व्हिलेज शोधून काढलं.
अलिफेरिस म्हणाला, "या गावातले लोक दुसऱ्या महायुद्धानंतर बंदराजवळील लिवाडिया गावात स्थायिक झाले. हे ऐतिहासिक गाव ओसाड पडलेलं पाहून मला खूप वाईट वाटलं. तेव्हा मी हे गाव पुन्हा वसवायचं स्वप्नं उराशी बाळगलं"
अलिफेरिस आणि त्याची पार्टनर वानिया योर्डानोव्हा यांनी या गावात बार सुरू केलं. या अंधाऱ्या ओसाड गावात पुन्हा जीव टाकला आणि हे गाव प्रकाशमय केलं आहे.
वानिया योर्डानोव्हा म्हणाली, "गावात पाणी, दिवे काहीही नव्हतं म्हणून सर्व सुखसोयींसाठी त्या गावात गेले. 30 मिनिटं लांब असलेल्या गावातून जनरेटर आणलं आणि तो लावल्यानंतर एखाद्या चित्रपटाच्या सेटप्रमाणे ते गाव प्रकाशमान झालं. ग्रीसच्या जुन्या संगीताचे सुर आसमंतात घुमू लागले आणि चंद्र-चांदण्यांनी नटलेली रात्र आणखीनंच सुंदर दिसू लागली"
हे वाचा - काय सांगता? 1 लाख 72 हजार वर्षांपूर्वीची लुप्त झालेली नदी पुन्हा सापडली
"दररोज रात्री 11 ते मध्यरात्रीपर्यंत आपण व्हॅनने जाऊन दुसऱ्या गावातून पर्यटकांना या गावात घेऊन येतो. इथं परदेशातनंही पर्यटक येतात. या गावातून दुसरीकडे गेलेल्या लोकांच्या पुढच्या पिढीतील लोकही पुन्हा इथं येऊन रहायला लागले आहेत. पण मला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या या प्रकल्पासाठी खूप खर्च करावा लागला. कष्ट घ्यावे लागले", असं अलिफेरिस यांनी सांगितलं.
मायक्रो चोरिओ हे एकच गाव नाही तर अशी बरीच दुर्लक्षित गावं आहेत. ज्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सरकारी, खासगी पद्धतीने होत आहेत. दक्षिण पेलोपोनइसमधील मणी पेनिन्सुलावर वाथिया हे गावदेखील त्यापैकीच एक. हे गाव युनिस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या मिस्ट्रास या ठिकाणापासून जवळ आहे. तिथं येणाऱ्या पर्यटकांना या गावाकडे वळवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
हे वाचा - टेक्नॉलॉजीची कमाल! जीव वाचवता वाचवता 'बिछडे यार'; 70 वर्षांनी पुन्हा झाली भेट
ऑफ क्रिट बेटावरचं स्पिनालोंगा हे छोटसं खेडंही असंच आहे. व्हिक्टोरिया हिस्लॉप यांच्या 2006 मध्ये आलेल्या जगप्रसिद्ध द आयलंड पुस्तकातही या गावाचं वर्णन आलं आहे. त्यावर ग्रीसमध्ये एक टीव्ही मालिकाही तयार झाली होती. त्यामुळे हे गाव पुन्हा चर्चेत आलं. अशा अनेक गावातं पर्यटनाला चालना देऊन ती पुन्हा वसवण्याचा प्रयत्न सुरू आहे.