मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Greying Of Hair : नैसर्गिकरित्या तुमचे केस काळे करू शकते चिंच, पाहा कसा करावा वापर

Greying Of Hair : नैसर्गिकरित्या तुमचे केस काळे करू शकते चिंच, पाहा कसा करावा वापर

आजकाल बहुतेक लोक लहान वयात केस पांढरे होण्यामुळे चिंतेत असतात. परंतु या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही चिंचेच्या पानांनी बनवलेले नैसर्गिक हेअर मास्क आणि हेअर स्प्रे वापरू शकता.

आजकाल बहुतेक लोक लहान वयात केस पांढरे होण्यामुळे चिंतेत असतात. परंतु या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही चिंचेच्या पानांनी बनवलेले नैसर्गिक हेअर मास्क आणि हेअर स्प्रे वापरू शकता.

आजकाल बहुतेक लोक लहान वयात केस पांढरे होण्यामुळे चिंतेत असतात. परंतु या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही चिंचेच्या पानांनी बनवलेले नैसर्गिक हेअर मास्क आणि हेअर स्प्रे वापरू शकता.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 14 सप्टेंबर : सुंदर केस तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालू शकतात. तर लहान वयात अचानक केस पांढरे होणे तुमच्यासाठी कदाचित लाजिरवाणी गोष्ट ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या केसांची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. वयाच्या आधी केस पांढरे झाले की, लगेच आपण बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअर प्रॉडक्टकडे धाव घेतो. मात्र अशा उत्पादनांमध्ये रसायने असतात, ज्यामुळे केसांना फायदा होण्याऐवजी कधीकधी ते कमकुवत होतात आणि केसांचे नुकसानदेखील होऊ शकते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी चिंचेच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तसेच नैसर्गिक केसांना कलरिंग एजंट आढळतात, जे केसांना नैसर्गिकरित्या रंग देण्यासोबत केसांच्या अनेक समस्यांपासून केसांचे संरक्षण करण्यास मदत करतात. चिंचेची पाने निरोगी आणि चमकदार केसांसाठी अनेक प्रकारे वापरली जातात. जाणून घेऊया कसे. चिंच कशी वापरावी चिंचेच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे केस नैसर्गिकरीत्या काळे होतातच पण केसांना कोरडेपणा, केस गळणे आणि कोंडा होणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

Benefits of Tea : भरपूर चहा प्या आणि मृत्यूचा धोका कमी करा; वाचा फायदे

केसांसाठी स्प्रे बनवा - DNPindia.in च्या मते, केस निरोगी ठेवण्यासाठी चिंचेच्या पानांपासून हेअर स्प्रे तयार केला जाऊ शकतो. जे नैसर्गिकरित्या केस काळे करण्यास उपयुक्त ठरू ठरते. - हेअर स्प्रे तयार करण्यासाठी आधी 5 कप पाण्यात अर्धा कप चिंचेची पाने मिसळा आणि उकळा. हे पाणी थंड होऊ द्या आणि नंतर आपल्या केसांमध्ये स्प्रे करा आणि थोड्या वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवा. ही प्रक्रिया दररोज केल्याने केसांमधील बॅक्टेरिया आणि घाणीपासून आराम मिळू शकतो. Difference Between Pure And Synthetic Milk : दुधातली भेसळ कशी ओळखायची? काही सोप्या टिप्स घ्या जाणून हेअर पॅक तयार करा - केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि केसांची नैसर्गिक चमक परत आणण्यासाठी तुम्ही चिंचेच्या पानांपासून बनवलेला हेअर मास्क वापरू शकता, ज्यामुळे केसांच्या पृष्ठभागावरील कोंडा दूर होईल आणि केस अकाली पांढरे होण्यापासूनदेखील सुटका मिळेल. - हा हेअर मास्क बनवण्यासाठी चिंचेची पाने दह्यासोबत मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. नंतर हा मास्क तुमच्या केसांना हलक्या हातांनी मसाज करत लावा. त्यानंतर ते कोरडे होऊ द्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
First published:

Tags: Digital prime time, Home remedies, Lifestyle, Woman hair

पुढील बातम्या