Home /News /lifestyle /

कधी ऐकलं का? समुद्राच्या पाण्यात द्राक्ष सडवून तयार केली जाते वाइन!

कधी ऐकलं का? समुद्राच्या पाण्यात द्राक्ष सडवून तयार केली जाते वाइन!

ग्रीसमधल्या थासोस बेटावर ही अगदी वेगळ्या प्रकारची वाइन केली जाते. ही वाइन द्राक्षांपासूनच तयार होते.

ग्रीसमधल्या थासोस बेटावर ही अगदी वेगळ्या प्रकारची वाइन केली जाते. ही वाइन द्राक्षांपासूनच तयार होते.

ग्रीसमधल्या थासोस बेटावर ही अगदी वेगळ्या प्रकारची वाइन केली जाते. ही वाइन द्राक्षांपासूनच तयार होते.

    मुंबई, 23 नोव्हेंबर : मद्यप्रेमींच्या मद्याबद्दलच्या काही खास आवडीनिवडी असतात. काही जणांना वाइन (Wine) प्रचंड आवडते. वाइन पिणाऱ्यांच्याही काही गोष्टी ठरलेल्या असतात. ती वाइन कुठल्या फळापासून (Fruit Wine) केली आहे, किती जुनी आहे, तिचा रंग, वास, चव याबद्दलचे काही आडाखेही असतात. सहसा द्राक्षांपासून केली जाणारी वाइन प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. द्राक्षं रगडून किंवा त्यांचा रस काढून वाइन केली जाते. तसंच अन्य काही फळांपासूनही वाइन केली जाते. परदेशांत तर वाइन अत्यंत आवडीनं प्यायली जाते. तिथे वाइन करण्याच्या अनेक पद्धती आणि प्रक्रियाही प्रसिद्ध आहेत. ग्रीसमध्येही (Greece) अशीच एका वेगळ्या प्रकारची वाइन केली जाते. जगभरात ही वाइन प्रसिद्ध आहे. ग्रीसमधल्या थासोस बेटावर ही अगदी वेगळ्या प्रकारची वाइन केली जाते. ही वाइन द्राक्षांपासूनच तयार होते. पण त्यासाठी जे पाणी वापरलं जातं त्याची एक खास गोष्ट आहे. ही वाइन तयार करण्यासाठी खास समुद्राचं पाणी (Wine From Sea Water) वापरलं जातं. त्याची प्रक्रियाही अगदी विशेष आहे. ही वाइन बनवण्यासाठी बरेच दिवस द्राक्षं समुद्राच्या पाण्यात ठेवली जातात. समुद्राच्या खाऱ्या पाण्यातल्या मिठाचा अंश या वाइनमध्ये उतरतो. ग्रीसमधल्या काही ठिकाणी ही स्पेशल वाइन तयार केली जाते. तिला ॲक्वानॉइन (Aquanoin Wine) वाइन असं म्हटलं जातं, याबद्दलचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'नं  दिलं आहे. विशेष म्हणजे ही वाइन तयार करण्यासाठी तिथे जर्मनीतूनही माणसं येतात. ही प्रक्रिया शिकून जर्मनीत परत जाऊन तिथेही अशा प्रकारची वाइन तयार केली जाते. खारट पाण्यामुळे वाइनची चव आणखीनच वाढते. वाइन बनवण्याची ही पद्धत अगदी जुनी, पारंपरिक आहे. ही पद्धत जवळपास दोन हजार वर्षं जुनी ही पद्धत आहे असं म्हटलं जातं. आता याच जुन्या पद्धतीनं बनवलेली वाइन जास्त लोकप्रिय होऊ लागली आहे. वडिलांचं अफेअर नाही पटलं, मुलगा आणि मुलीने केला महिलेचा खून त्याशिवाय ग्रीसची जमीन द्राक्षांसाठी अत्यंत चांगली मानली जाते. खरंतर गेल्या 60 वर्षांपासून तिथल्या स्थानिक नागरिकांनी अशा पद्धतीनं वाइन बनवणं सोडून दिलं होतं; पण आता जर्मनीतल्या नागरिकांनी ग्रीसमध्ये येऊन ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. ग्रीसच्या या परिसरात अनेकांचे पूर्वज हेच वाइनचं काम करत होते. ती वाइन खूप प्रसिद्धही होती; पण सरकारनं वाइन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी काहीच पावलं उचलली नाहीत. त्यामुळे हा उद्योग खूप कमी झाला होता, असं DW च्या एका रिपोर्टमधून पुढं आलं आहे. आता पुन्हा अशा प्रकारची वाइन आवडू लागल्यानं कदाचित अनेकांच्या हाताला पुन्हा रोजगार मिळू शकेल. अरेरे! जंगलाचा राजाही तिच्यासमोर भित्रा बोका; सिंहिणीने सिंहाचं काय केलं पाहा वाइन तयार करण्याची ही प्रक्रिया कशी असते, ते DW च्या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं आहे. द्राक्षं तोडून ती एका जाळीदार टोपलीत भरली जातात. या टोपल्या मग पूर्णपणे बंद केल्या जातात. पाणबुड्यांच्या मदतीनं या द्राक्षांनी भरलेल्या टोपल्या समुद्राच्या खाली 15 मीटर ठेवल्या जातात. या टोपल्यांना विशेष प्रकारचे फुगे बांधले जातात. साधारणपणे पाच ते सहा दिवस या टोपल्या तशाच पाण्याखाली ठेवल्या जातात. म्हणजेच समुद्राच्या पाण्यात असतात. त्यामुळे समुद्राचं पाणी या द्राक्षांच्या चवीला पूर्णपणे बदलून टाकतं आणि त्या वाइनला एक वेगळीच स्पेशल चव मिळते. या वाइनमध्ये मीठ मुख्य असतं. मिठामुळेच तिची चव बदलते. अशी अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं तयार करण्यात येणारी वाइन पिणं वाइनप्रेमींना अर्थातच आवडेल. ही प्रक्रिया अवघड असली तरी आता पुन्हा त्याकडे लोक आकर्षित होऊ लागले आहेत. समुद्राच्या पाण्यापासून तयार होणाऱ्या या वाइनची लोकप्रियता म्हणूनच आता युरोपीय देशांमध्ये वाढू लागली आहे.
    First published:

    पुढील बातम्या