कोरोना महासाथीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे; मग जरूर करा 5 फळांचं सेवन

कोरोना महासाथीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे; मग जरूर करा 5 फळांचं सेवन

कोरोना असो किंवा इतर कोणताही आजार त्याच्याशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) खूप महत्त्वाची असते.

  • Last Updated: Sep 12, 2020 12:18 PM IST
  • Share this:

कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या गरजेवर जोर दिला जात आहे. रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता वाढवून विषाणू आणि इतर रोगांपासून स्वतःला दूर ठेवता येतं. ते साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे पौष्टिक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं.

myupchar.com च्या डॉ. आकांक्षा मिश्रा यांनी सांगितलं, शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ताजी फळं आणि भाज्या खायला हव्यात, कारण त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते शरीराला विविध आजारांपासून वाचवतात. जीवनसत्त्व सी असलेले पदार्थ प्रतिकारशक्ती वाढवतात. भारत सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएएआय) अलीकडेच अशा काही पदार्थांबाबत माहिती दिली आहे. यामध्ये आवळा, संत्री, पपई, सिमला मिरची, पेरू आणि लिंबू यांचा समावेश आहे. जीवनसत्त्व सी असण्याव्यतिरिक्त या फळांमध्ये असे बरेच घटक आहेत, ज्यामुळे इतर फायदेही होतात.

आवळा

myupchar.com  चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, रोगप्रतिकारक शक्ती हानिकारक संक्रमणाविरूद्ध लढा देते आणि शरीराच्या आजारापासून मुक्त राहण्यास मोठी भूमिका बजावते. आवळा जीवनसत्त्व सी समृद्ध असल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतं आणि रोगांविरूद्ध लढायला पुरेशी क्षमता देते. अर्धा कप कोमट पाण्यात आवळ्याचा रस समान प्रमाणात मिसळा आणि दररोज प्या.

संत्र

आंबट फळ असल्याने संत्र्यामध्ये जीवनसत्त्वं सी भरपूर असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक असतं. जीवनसत्त्व सी जीवाणू आणि विषाणूंशी लढणार्‍या पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीस प्रोत्साहन देतं. याव्यतिरिक्त संत्र्यामध्ये भरपूर पॉलिफेनोल्स असतात जे विषाणूजन्य संक्रमणापासून बचाव करतात. इतकंच नाही तर यातील जीवनसत्त्व ए, फोलेट आणि तांबे यासारखी पोषकद्रव्ये देखील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात विशेष भूमिका बजावतात.

पपई

पपईमध्ये जीवनसत्त्व सी पांढर्‍या रक्त पेशी वाढवण्यास मदत करतं आणि पेशींना हानी पोहोचण्यापासून वाचवते. पपईमध्ये इतर शक्तिशाली रोगप्रतिकारक प्रथिनं, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे अ आणि ई देखील आहेत. निरोगी रोगप्रतिकारक यंत्रणेच्या योग्य कार्यासाठी जीवनसत्त्वे ए आणि ई दोन्ही आवश्यक आहेत. ज्यांना सर्दी, ताप आणि खोकला याचा सहसा त्रास होतो त्यांच्यासाठी पपई खूप चांगली मानली जाते.

भोपळी मिरची

जीवनसत्त्व सी, तंतुमय पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट्स यासारख्या अनेक महत्त्वाच्या पोषक द्रव्यांसह भोपळी मिरची समृद्ध आहे. अअँटिऑक्सिडंट्समुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं आणि अशक्तपणा कमी होतो, असं काही अभ्यासात दिसून आलं आहे.

पेरू

पेरूमध्ये पोटॅशियम आणि तंतुमय घटक असतात. ज्यांच्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारते आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.  आणि मासिक पाळीतील वेदनांपासूनही मुक्ती मिळते. ताप आणि डेंग्यू तापाबरोबर लढायलाही हे घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

लिंबू

लिंबू वजन कमी करणं, हृदय आणि पचन सुधारण्यासाठी ओळखलं जातं. लिंबामधील साइट्रिक अॅसिड मूत्र आणि शरीरातील पीएच पातळी वाढवून मूत्रपिंडातील खडे रोखण्यास मदत करतात.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - गिलॉयचे फायदे, वापर, सहप्रभाव आणि मात्रा

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 12, 2020, 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading