Home /News /lifestyle /

नरेंद्र मोदींच्या सकाळच्या व्हिडिओ मेसेजनंतर लोकांनी Google वर शोधलं Dada Kondke; हे आहे कारण

नरेंद्र मोदींच्या सकाळच्या व्हिडिओ मेसेजनंतर लोकांनी Google वर शोधलं Dada Kondke; हे आहे कारण

मोदींचं भाषण संपल्यानंतर सोशल मीडियावर #ModiVideoMessage हा ट्रेंड सुरू झाला. पण गंमत म्हणजे Google वर सर्वाधिक सर्च झाला दादा कोंडकेंचा. असं का झालं?

    मुंबई, 3 एप्रिल : सकाळी 9 वाजता पंतप्रधान मोदींनी जनतेला उद्देशून एक व्हिडीओ संदेश दिला. लॉकडाउनच्या घोषणेला 10 दिवस झाल्यानंतर मोदी प्रथमच या पद्धतीने जनतेसमोर आले होते. त्यांनी 5 तारखेला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरात अंधार करून दारात किंवा बाल्कनीत दिवे, मेणबत्त्या लावण्याचं आवाहन केलं. हे भाषण संपल्यानंतर सोशल मीडियावर #ModiVideoMessage हा ट्रेंड सुरू झाला. पण गंमत म्हणजे Google वर सर्वाधिक सर्च झाला दादा कोंडकेंचा. असं का झालं? मोदींच्या संदेशाचा दादा कोंडकेंशी काय संबंध? मोदींच्या व्हिडीओ संदेशानंतर सोशल मीडियावर पणत्या, दिया मेणबत्त्या शोधून लोक वेगवेगळे मीम्स (Memes)बनवायला लागले. लोकांनी गमतीत दिया मिर्झाला टॅग करत तिचाही फोटो लावला. हातात दिवा घेतलेली नायिका असणारे अनेक बॉलिवूडचे प्रसंग शोधले गेले आणि मीम्स केली गेली. त्यातच लोकांना आठवला 1986 चा दादा कोंडकेंचा हिंदी चित्रपट - 'अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे'. अनेकांनी या चित्रपटाचं पोस्टर शोधून ते शेअर केलं. म्हणूनच मोदींच्या भाषणानंतर दादा कोंडकेंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. दादा कोंडके मराठी जनतेला  त्यांच्या अस्सल विनोदी ढंगाच्या भूमिकांमुळे यापूर्वीपासूनच माहिती होते. त्यांचा सोंगाड्या चित्रपट अनेकांच्या स्मरणात असेल. 2 फूट लांबून पत्नीनं वाढलं जेवण; पतीनं मारला डोक्यावर हात, पाहा VIDEO सर्वाधिक चित्रपट सिल्व्हर ज्युबिली म्हणजे 25 आठवड्यांहून अधिक काळ बॉक्स ऑफिसवर राहिले म्हणून दादांची गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. विनोदी चित्रपटांची लाट त्यांनी मराठीत आणली.  पण या लोकप्रिय कलावंताची ओळख मराठी सोडता इतर प्रांताला झाली ती अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मे या चित्रपटाने. हा चित्रपट दादांनीच दिग्दर्शित केला होता आणि यात दादा कोंडकेंसह उषा चव्हाण आणि अमजद खान यांच्या भूमिका होत्या. आता हा सिनेमा पुन्हा चर्चेत आल्या मोदींच्या घोषणेमुळे. दादांचे चित्रपट त्यातल्या द्व्यर्थी संवादांसाठी ओळखले जायचे. तसाच हाही हिंदी चित्रपट ओळखला गेला. दादा कोंडके नावाच्या अवलियाची आठवण या निमित्त पुन्हा एकदा देशाला झाली. अन्य बातम्या मोदींच्या सूचनेनंतर लॉकडाऊन संपवण्यासाठी तयारी, समोर आला 4 आठवड्यांचा नवा प्लॅन कोरोना लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा फायदा, पृथ्वीचे व्हायब्रेशन झाले पूर्वीपेक्षा कमी
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या