पॉर्न पाहताय? हिस्ट्री डीलिट केलीत तरी तुमच्यावर आहे गुगलचं लक्ष

पॉर्न पाहताय? हिस्ट्री डीलिट केलीत तरी तुमच्यावर आहे गुगलचं लक्ष

तुम्ही पॉर्न बघत असलात आणि नंतर हिस्ट्री डीलिट करत असलात किंवा ब्राउझरमध्ये सेटिंग करत असलात तरी गुगल आणि फेसबुकला त्याचे डिटेल्स मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 27 जुलै : काही दिवसांपूर्वी एक संशोधन झालं होतं त्यानुसार पॉर्न व्हिडिओमुळं पर्यावरण धोक्यात येत असल्याचा निष्कर्ष काढला होता. आता आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. तुम्ही मोबाईलवर incognito ब्राऊजरमधून जरी पॉर्न बघत असला तरी तुमची माहिती फेसबुक आणि गुगलकडे जात आहे. मायक्रोसॉफ्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसेल्व्हानिया आणि कार्नेगी मेलॉनने संशोधन केलं. यातून ही गोष्ट समोर आली.

संशोधनामध्ये जगभरात प्रौढांसाठी असलेल्या 22 हजार 484 वेबसाइट स्कॅन करण्यात आल्या. यामध्ये सर्व युजर्सचा डेटा इतरांना पाठवला जात असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये जवळपास 93 टक्के वेबसाइट थर्ड पार्टी अॅप कंपन्यांना त्यांच्या युजर्सची माहिती शेअर करतात.

केवळ 17 टक्के वेबसाइटवर इन्क्रिप्शन फिचर आहे. तर उरलेल्या 93 टक्के वेबसाइटमधील 74 टक्के पॉर्न साइटला गुगल आणि इतर कंपन्यांकडून ट्रॅक केलं जात होतं. सॉफ्टवेअर कंपनी ऑरकेलसुद्धा 24 टक्के पॉर्न साइटला ट्रॅक करत असल्याचं समोर आलं आहे. तर फेसबुक 10 साइटमागे एक या प्रमाणात ट्रॅक करते.

WEIGHTLOSS : जर या 10 सवयी पाळत नसाल तर, तुमचं वजन कमी होणे कठीणच !

पॉर्न पाहणं ही प्रत्येकाची खासगी गोष्ट आहे. त्यावर लक्ष ठेवणं चुकीचं असून फक्त 17 टक्के वेबसाइट प्रायव्हसी पॉलिसी फॉलो करत असल्याचं संशोधक डॉ. मॅरिस यांनी सांगितलं. ते म्हणाले की, ज्या प्रकारे युजर्सना ट्रॅक केलं जात आहे ती बाब अत्यंत चिंताजनक आहे.

पॉर्न बघितल्यामुळं होतं पर्यावरणाचं नुकसान, संशोधकांचा दावा!

संशोधकांनी जरी दावा केला असला तरी याबाबत गुगल आणि फेसबुकने मात्र पॉर्न साइट पाहणाऱ्यांचा डेटा ट्रॅक करत असल्याचं फेटाळून लावलं आहे. गुगलने म्हटलं की, आम्ही प्रौढांसाठी असलेल्या साइटवर जाहिरात दाखवण्याच्या विरोधात आहे. तर फेसबुकने आपण अशा प्रकारच्या साइटला ट्रॅक करत नसल्याचं म्हटलं आहे.

VIDEO: मृत्यू जवळ येत होता आणि हे आजोबा जीव मुठीत धरून बसले होते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 06:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading