दिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला

दररोजची सकाळ प्रसन्न असावी, म्हणजे पूर्ण दिवस तसाच मूड राहतो. पण काही कारणाने सकाळीच कंटाळा आला, मूड गेला तर... हे 7 उपाय त्या वेळी येतील कामी...

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 07:47 AM IST

दिवसाची सुरुवात या 7 गोष्टींनी केलीत तर दिवस हमखास जाईल चांगला

गजर लावून ठरलेल्या वेळेत उठण्याचा प्रयत्न करा. उठल्याबरोबर उशीर झाल्याने होणारी चिडचिड यामुळे वाचेल. नियमितपणे एकाच वेळी उठायचा प्रयत्न केला तर शरीराला त्याची सवय होते आणि आपोआप जाग येते.

मोबाईलवर गजर लावून snooz करायची सवय टाळा. ती दहा मिनिटं आणखी झोपायचं मन करतं हे खरं पण त्यामुळेच अंगात आळस भरतो आणि तो दिवसभर टिकतो.

सकाळी कोमट पाणी प्या. यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. पाण्यात थोडं लिंबू आणि मध घालून प्यायलात तर जास्त फायदा होईल. पोट साफ झालं तर दिवस चांगला जातो, याचा अनुभव तुम्हाला असेलच.

सकाळी कुठलंही इतर काम करण्यापूर्वी किमान 5 ते 10 मिनिटं दीर्घ श्वसन किंवा प्राणायाम करा. एकाग्र चित्त करून प्राणायाम केलात तर नकारात्मक विचारांचा मनातून निचरा व्हायला मदत होते.

सकाळी स्वतः बनवलेला चहा किंवा कॉफी घेऊन पाहा. त्यातून एक वेगळी ऊर्जा मिळेल.

Loading...

सकाळी लवकर उठलात तर किमान 45 मिनिटं बाहेर मोकळ्यावर चालण्याचा व्यायाम किंवा जॉगिंग करून या. सकाळच्या वेळी आळसामुळे शरीर नको म्हणेल, तरीही अवश्य बाहेर पडा.

इतर कामांना सुरुवात करण्यापूर्वी चांगला ब्रेकफास्ट करा. ताजी फळं, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ यांचा न्याहारीत समावेश अवश्य करा. या 7 गोष्टी केल्यात तर दिवस उत्साहात जाणार हे निश्चित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 07:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...