Home /News /lifestyle /

Golden blood : जगातील सर्वांत दुर्मिळ ब्लड ग्रुप, कुणालाही चालू शकतं हे रक्त, पण फक्त 43 जणांमध्येच आढळलं

Golden blood : जगातील सर्वांत दुर्मिळ ब्लड ग्रुप, कुणालाही चालू शकतं हे रक्त, पण फक्त 43 जणांमध्येच आढळलं

मानवी शरीराला कार्य करण्यासाठी रक्ताची गरज असते. तुम्ही सर्वांनी ए,बी, ओ, एबी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा अनेक रक्तगटांबद्दल ऐकलं असेल. पण एक रक्तगट असाही आहे, ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. त्या रक्तगटाचे नाव आहे 'गोल्डन ब्लड ' (Golden Blood) .

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 जानेवारी : 'रक्तदान जीवनदान', अशा घोषणांच्या माध्यमातून रक्तदानाचं (blood donation ) महत्त्व सर्वांना पटवून दिलं जातं. रक्त प्रत्येकाच्या शरीरासाठी (human body ) किती उपयोगी आहे, हे सर्वांना माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक ब्लड ग्रुप (blood group ) असतो. आतापर्यंत ए, बी, ओ, एबी पॉझिटिव्ह-निगेटिव्ह अशा ब्लड ग्रुपबाबत तुम्ही ऐकलं असेलच. पण जगात आणखी एक असा ब्लड ग्रुप आहे, जो फार कमी लोकांमध्ये आढळतो. आज आम्ही तुम्हाला एका अशा ब्लड ग्रुपबाबत सांगणार आहोत, जो जगात सर्वात दुर्मिळ आहे. 'झी न्यूज'ने याबाबत वृत्त दिलयं. मानवी शरीराला कार्य करण्यासाठी रक्ताची गरज असते. तुम्ही सर्वांनी ए,बी, ओ, एबी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा अनेक रक्तगटांबद्दल ऐकलं असेल. पण एक रक्तगट असाही आहे, ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. त्या रक्तगटाचे नाव आहे 'गोल्डन ब्लड ' (Golden Blood) . याला 'आरएच नल' (Rh Null Blood Group) नावानेही ओळखलं जातं. हा रक्तगट दुर्मिळ असल्याने संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी त्याला 'गोल्डन ब्लड' असं नाव दिलंय. हे रक्त खूपच मौल्यवान (Blood Group Test Price) आहे, कारण ते कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तींना चालू शकतं. ज्या लोकांच्या शरीरात आरएच फॅक्टर शून्य आहे, त्याच्या शरीरामध्येच हे रक्त आढळते. (...आणि प्राध्यापक-मुख्यध्यापक एकमेकांना भिडले, प्रचंड हाणामारी, VIDEO व्हायरल) आरएच फॅक्टर ( Rh Factor ) हे लाल रक्तपेशींच्या (Red Blood Cells) पृष्ठभागावर आढळणारे एक प्रोटिन असतं. हे प्रोटिन आरबीसीमध्ये (Red Blood Cells) असेल तर रक्त आरएच-पॉझिटिव्ह असतं. याउलट, प्रोटिन नसल्यास, रक्त आरएच-निगेटिव्ह असतं. या प्रोटिनला आर एचडी अँटिजेन ( Antigen ) असेही म्हणतात. परंतु या गोल्डन ब्लड रक्तगटाच्या लोकांमध्ये, आरएच घटक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसतो, तो नल अर्थात शून्य असतो. ...म्हणून करतात वेळोवेळी रक्तदान बिगथिंकच्या एका संशोधनानुसार, 2018 पर्यंत हे गोल्डन ब्लड फक्त 43 लोकांमध्ये आढळले होते. यामध्ये ब्राझील, कोलंबिया, जपान, आयरलँड आणि अमेरिकेतील लोकांचा समावेश आहे. हे रक्त कोणत्याही ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला देता येते. परंतु जर गोल्डन ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीला रक्ताची आवश्यकता असेल, तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. केवळ 43 लोकांचाच हा रक्तगट असल्याने त्यांचा रक्तदाता शोधणेही अवघड होते.आंतरराष्ट्रीय स्तरावर रक्ताची वाहतूक करणे कठीण काम आहे. त्यामुळेच गोल्डन ब्लड ग्रुप असणारे लोक वेळोवेळी रक्तदान करीत असतात. त्यामुळे त्यांचे रक्त रक्तपेढीत जमा राहते, व ते इतर कोणालाही दिले जात नाही. जेव्हा गरज असेल, तेव्हा हे रक्त संबंधित व्यक्तीला दिले जाते. अनेकांना गोल्डन ब्लडबद्दल फारशी माहिती नसते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या रक्तगटात कोणतेही अँटीजन आढळत नाही. यूएस रेअर डिसीज इन्फॉर्मेशन सेंटर (US Rare Disease Information Centre) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डन ब्लड ग्रुपमध्ये अँटीजन नसतात, त्यामुळे ज्या लोकांच्या शरीरात हे रक्त असते त्यांना अॅनिमियाची त्रास असू शकतो. अशा लोकांना स्वतःच्या आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. लोह असलेल्या अधिकाधिक गोष्टींचे सेवन करण्याचे त्यांना सांगितले जाते. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे मनुष्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. एखाद्या व्यक्तीला रक्त देण्याची गरज पडल्यास रक्तदाता शोधणे, रक्तपेढीत जाऊन तेथे संबंधित रक्तगटाची पिशवी आहे का, याचा शोध घेणे, यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू असते. पण गोल्डन ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांची संख्या जगात खूपच कमी आहे. त्यामुळे हे लोक भविष्यात स्वतःला रक्ताची आवश्यकता पडू शकते, यामुळे नियमित रक्तदान करून स्वतःच स्वतःच्या रक्ताची सोय करून ठेवतात.
    First published:

    पुढील बातम्या