OMG VIDEO : या श्रीमंत शहरात मिळते सोन्याची मिठाई!

OMG VIDEO : या श्रीमंत शहरात मिळते सोन्याची मिठाई!

सण असो की नसो... आपल्याला कधीही मिठाई खायला आवडतेच. मिठाईची हाव धरायला तिला काय सोनं लागलंय का ? असंही आपण गंमतीने म्हणतो. पण हो. ही काही फक्त गंमत नाही. सुरतमध्ये असं एक मिठाईचं दुकान आहे जिथे खरंच सोन्याची मिठाई मिळते.

  • Share this:

सुरत, 18 जुलै : सण असो की नसो... आपल्याला कधीही मिठाई खायला आवडतेच. मिठाईची हाव धरायला तिला काय सोनं लागलंय का ? असंही आपण गंमतीने म्हणतो. पण हो. ही काही फक्त गंमत नाही. सुरतमध्ये असं एक मिठाईचं दुकान आहे जिथे खरंच सोन्याची मिठाई मिळते.

या श्रीमंत शहरात मिठाईप्रेमी काही कमी नाहीत. मोतीचूर लाडूपासून ते कुकीज, क्रीम फ्लेवर बर्फीपर्यंत सगळ्या प्रकारची मिळाई इथे मिळते. पण सुरतचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.

इथल्या 24 कॅरेट्स मिठाई मॅजिक या दुकानामध्ये खरंच नावाप्रमाणेच सोन्याची मिठाई मिळते. सुरतमधलं हे मिठाईचं दुकान 84 वर्षं जुनं आहे. या दुकानदारांच्या पाचव्या पिढीने आता इथे सोन्याची मिठाई लाँच केलीय.

ही सोन्याची मिठाई बनते असली ड्रायफ्रुट्सपासून. यामध्ये घातलेलं केशर खास स्पेनमधून मागवण्यात येतं. मिठाई तयार झाली की त्यावर असली सोन्याचा वर्ख लावला जातो.

ही मिठाई घ्यायची असेल तर तुम्हाला तब्बल 9 हजार रुपये मोजावे लागतील. म्हणजे जेवढ्या पैशात दहा किलो काजू कतली येते त्या पैशात ही सोन्याची एक किलो मिठाई घेता येईल.त्यातही सोन्याचे दर वाढले तर या मिठाईचा भाव वाढूही शकतो.

आपण सोनं खाऊ शकतो का?

अशी सोन्याची मिठाई विकणं हे या दुकानदारांसमोर आव्हान नव्हतं का? म्हणजे, एवढे पैसे खर्च करायचे आणि सोनं खाऊन पोटबिट खराब तर होत नाही ना ? हा प्रश्न आहेच.

आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते, सोनं खाण्याने काहीही नुकसान नाही. उलट फायदेच जास्त आहेत. सोन्यामुळे रक्ताभिसरण वाढतं. शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाणही वाढतं. पूर्वी आयुर्वेदात सोन्याच्या भस्माचं औषधही देत असत.

मिठाईचे दुकानदार सांगतात, आम्ही या मिठाईला सोन्याचं प्रमाणपत्र मिळवलं आहे. शिवाय या मिठाईसोबत सोनं खाल्ल्यामुळे होणाऱ्या फायद्याचं एक पत्रकही आम्ही जोडतो.

लग्नानंतरही या 5 गोष्टी कधीच बदलत नाहीत

तिजोरीतली वस्तू फ्रीजमध्ये

सुरतमधले मिठाईप्रेमीही या मिठाईवर फिदा आहेत. ही मिठाई खूपच क्रिएटिव्ह आहे, असं त्यांना वाटतं. बरेच जण तर या मिठाईसोबत सेल्फी काढून मगच ती खातात.

मिठाईवरचं सोन्याचं पानही सगळ्यांना खूपच आवडतं. आणि खरंतर ही मिठाई फ्रीजमध्ये नाही तर तिजोरीमध्ये ठेवायला हवी, असंही काहींचं मत आहे !

======================================================================================

पुण्यात अवतरला नवा गोल्डन मॅन, दररोज घालतो फक्त 5 किलो सोनं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldsweets
First Published: Jul 18, 2019 08:30 PM IST

ताज्या बातम्या