दिल्ली, 05 एप्रिल : भारतात असे किती तरी लोक आहेत जे पान (Paan) खातात. काही जणांना दररोज पान लागतं. तर काही जणांनी कधी ना कधी तरी एकदा गोड पानाची (Sweet paan) का होईना चव चाखलीच आहे. पण आता गोड नाही तर गोल्ड पानही (Gold paan) आलं आहे. गोड गोल्ड पानाची चव जितकी भारी तितकीच त्याची किंमतही भारी आहे. सध्या सोशल मीडियावर याच गोड गोल्ड पानाची चर्चा सुरू आहे.
पान तसं बऱ्याच वेगवेगळ्या फ्लेव्हर्स आणि व्हरायटीमध्ये मिळतं. याआधी तुम्ही चॉकलेट, आइस, फायर, चुस्की असे बरेच पान पाहिले असतील. आता तर चक्क गोल्ड पानही आलं आहे. दिल्लीत एका पानाच्या दुकानात गोल्ड पान विकलं जातं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
View this post on Instagram
@yamuspanchayat_official या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक महिला गोल्ड पान बनवत आहेत. ती पानात सुकं खजूर, वेलची, गोड चटणी, गुलकंद, लवंग, चेरी टाकून लपेटून घेते. म्हणजे जसं सामान्य गोड पान बनवलं जातं अगदी तसंच ती सुरुवातीला बनवते आणि शेवटी वरून त्या पानाला गोल्ड वर्क लावून चेरीसोबत गार्निश करते.
हे वाचा - कोणताही डाएट नाही तर फक्त बिअर पिऊन फॅट टू फिट; घटवलं तब्बल 18 किलो वजन
हा शुद्ध सोन्याचा वर्क आहे. त्यामुळे साहजिकच त्याची किंमतही जास्त आहे. या एका पानाची किंमत तब्बल 600 रुपये आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेकांनी हे पान खूपच महागडं असल्याचं म्हटलं आहे. एकाने तर या किमतीत आपण पूर्ण वर्षभर पान खाऊ असं म्हटलं आहे. पण तुम्ही गोल्ड आणि पानाचे शौकिन असाल तर तुम्हाला की किंमत जास्त वाटणार नाही.
हे वाचा - हा पदार्थ खायचा की प्यायचा? वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश
आता तुम्हालासुद्धा हे पान महाग वाटत असावं, पण तरी तुम्हाला एकदा तरी त्याची चव चाखायची आहे. तर मग तुम्हाला दिल्लीला जावं लागे. दिल्लीतील कनॉट प्लेसमधील जावं लागेल. यामू की पंचायत नावाचं पान पार्लर आहे. जिथं हे गोल्ड पान मिळतं. हे पान पार्लर वेगवेगळ्या प्रकारच्या पानांसाठी प्रसिद्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.