मुंबई, 29 नोव्हेंबर : उत्तम आरोग्य आणि फिटनेससाठी तज्ज्ञ दूध पिण्याची शिफारस करतात. बहुतेक लोक फक्त गाय आणि म्हशीचे दूध पिण्यासाठी आणि खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरतात. मात्र तुम्हाला माहितीये? शेळीचे दूध आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. शेळीच्या दुधामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही सुधारते.
वेबएमडीच्या बातमीनुसार, जगातील तीन चतुर्थांश लोकसंख्या फक्त शेळीचे दूध वापरते. शेळीचे दूध नेहमी आरोग्य तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच प्यावे. शेळीचे दूध आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचय वाढवण्याचे काम करते आणि डेंग्यूसारख्या धोकादायक आजारातही ते खूप फायदेशीर आहे. शेळीचे दूध गाईच्या दुधापेक्षा जास्त घट्ट असते.
Winter Health Tips : हिवाळ्यात चुकूनही एकत्र खाऊ नका हे पदार्थ, शरीराचे होईल मोठे नुकसान
शेळीच्या दुधाचे आरोग्य फायदे
- शेळीचे दूध पचायला सोपे असते.
- या दुधाच्या ऍलर्जीचा धोका कमी असतो.
- यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
- जळजळ होण्याची समस्या कमी करण्यासाठी हे दूध प्रभावी आहे.
- हाडे लवकर मजबूत होतात.
- हे दूध चिंतादेखील कमी करते.
व्हिटॅमिन 'ए' चा चांगला स्रोत
शेळीचे दूध हे व्हिटॅमिन 'ए' चा उच्च स्त्रोत आहे. याचे दररोज सेवन केल्यास मोतीबिंदू आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो. अनेक वेळा आरोग्य तज्ज्ञ गोवर झाल्यास मुलांना शेळीचे दूध देण्याचा सल्ला देतात.
कोलेस्ट्रॉल कमी करते
जर तुम्ही उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असाल तर ते कमी करण्यासाठी शेळीचे दूध खूप उपयुक्त ठरू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बकरीचे दूध रक्तवाहिन्या आणि पित्ताशयातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करू शकते.
शेळीच्या दुधाने या आजारांचाही धोका होतो कमी
झी न्युजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शेळीच्या दूध प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन नियंत्रित राहते. रोज शेळीचे दूध ल्यायल्यास हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे हे दूध शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखते.
Winter Health Tips : हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळणं होईल सोपं, फक्त खा हे पदार्थ
एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, शेळीच्या दुधात लोह जास्त असते. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळीही वाढते. शेळी आणि गाईच्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण जास्त असते. शेळीच्या दुधात 100 ग्रॅममध्ये 4.1 ग्रॅम लॅक्टोज असते, तर गाईच्या दुधात 4.6 ग्रॅम लॅक्टोज (18) असते. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की शेळीचे दूध सर्वांनाच पचत नाही आणि त्याचा फायदा सर्वांना होईलच असे नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle