Home /News /lifestyle /

Goa In Monsoon : पावसाळ्यात गोव्याला जाताय? हे शॅक्स आणि रेस्टॉरंट्स तुमच्यासाठी आहेत बेस्ट ऑप्शन

Goa In Monsoon : पावसाळ्यात गोव्याला जाताय? हे शॅक्स आणि रेस्टॉरंट्स तुमच्यासाठी आहेत बेस्ट ऑप्शन

तुम्ही पावसाळ्यात गोव्याला जात असाल (Visit Goa in Monsoon) तर हा लेख तुमच्यासाठी खुप उपयोगी ठरणार आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला तुम्हाला गोव्यातील नक्की भेट द्यावी अशा सर्वात लोकप्रिय शॅक आणि समुद्रकिनाऱ्यावरील रेस्टॉरंट्सविषयी (Popular Shacks and Beach in Goa) माहिती देत आहोत.

पुढे वाचा ...
  मुंबई, 20 जून : तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गोव्याला भेट (Visit Goa) देण्याचा विचार करत आहात का? तुमचे उत्तर हो असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फादेशीर (Information About Goa Tourism) ठरणार आहे. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की नोव्हेंबरच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत गोव्यात पर्यटनासाठी जाण्याचा सर्वोत्तम काळ (Best Time to Visit Goa) असतो. मात्र ऑफ-सीझनमध्ये देखील गोव्याला भेट (Visit Goa in Off-season) देणे खूप आनंदायी ठरू शकते. ऑफ-सीझनमध्ये पावसाळ्यात (Visiting Goa in Monsoon) गोव्यातील हॉटेल्स स्वस्त आणि समुद्रकिनारे शांत असतात, तसेच ज्यांना पाऊस आवडतो त्यांच्यासाठी गोव्याला भेट देण्याची हा सर्वोत्तम काळ आहे. येथे येण्यासाठी तुम्हाला खूप माहिती गोळा करण्याची गरज नाही. कारण या लेखातून आम्‍ही तुम्हाला गोव्यात आल्यानंतर आवश्‍य भेट द्यावी अशा सर्वात लोकप्रिय शॅक आणि समुद्रकिनाऱ्यावरील रेस्टॉरंट्सविषयी (Popular Shacks and Beach in Goa) माहिती देत आहोत. पावसाळ्यात तुम्ही प्रेमात पडाल अशा ठिकाणांची यादी तेरेझा बीच हाऊस, नेरुळ (Tereza Beach House, Nerul) स्ली ग्रॅनी (Sly Granny) आणि मामागोटो (Mamagoto) यांच्या टीमने बनवलेले हे 136 सीटर शॅक आहे. हे शॅक रात्रीच्या जेवणासह लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्सच्या माध्यमातून तुमचे मनोरंजन करते. येथे तुम्हाला विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ आणि पेये मिळतात जे तुमचे मन जिंकल्याशिवाय राहणार नाहीत.

  आपल्या चेहऱ्यावर भुवया का असतात? कारण आहे खूपच खास

  ब्रिटोस, बागा (Brittos, Baga) ब्रिटोस हे गोव्यातील बागा बीचवर (Baga Beach) 1965 पासून वसलेल्या सर्वात जुन्या आस्थापनांपैकी एक आहे. जबरदस्त सीफूडसाठी ओळखले जाणारे आणि तुमच्या जिभेचे चोचले पुरवणारे हे एक हे एक शानदार शॅक आहे. येथे तुम्हाला बारचाही आनंद लुटता येईल आणि आठवणीत राहील असा समुद्र किनारा तुम्हाला येथे अनुभवता येईल. ला प्‍लेज, अश्‍वेम बीच (La Plage, Ashwem Beach) ला प्‍लेज हे गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथील मेनूमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या फ्रेंच, अमेरिकन आणि कॉन्टिनेंटल पदार्थांचा समावेश आहे. तुम्हाला फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि सीफूड हवे असल्यास अश्वेम बीचवरील हे शॅक तुमच्यासाठी योग्य ठिकाणा आहे.

  Fever in child : पावसाळा सुरू होताच मुलांना ताप भरतो; या 6 गोष्टींची घ्या नीट काळजी

  लश बाय द क्लिफ, अंजुना (Lush by the Cliff, Anjuna) तुम्हाला सूर्यास्त पाहायला आवडत असेल तर हे तुमच्यासाठी सर्वात योग्य ठिकाण आहे. हे एक पूर्णपणे व्हाईट रेस्टॉरंट आहे जेथे तुम्हाला मेनूमध्ये कबाब, सॅलड्स, स्टीक्स आणि सिझलर्स असे पदार्थ ऑफर केले जातात. येथे सर्वोत्कृष्ट कॉकटेल मिळते आणि आपल्या जोडीदारासोबत जाण्यासाठी हे अतिशय योग्य ठिकाण आहे. सबलाइम , मोरजिम (Sublime, Morjim) तुम्ही मांस प्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. मोरजिममध्ये स्थित सबलाइम तोंडाला पाणी आणणारे अनेक पदार्थ ऑफर करते. मांसाव्यतिरिक्त येथे युरोपियन पाककृतींमधले विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ मिळतात आणि यामुळे ते अधिक आकर्षक ठरते.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Goa, Lifestyle, Monsoon, Tour, Travel

  पुढील बातम्या