मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Global Handwashing Day: कोरोना काळात हात धूत राहणं का आहे महत्त्वाचं? जाणून घ्या !

Global Handwashing Day: कोरोना काळात हात धूत राहणं का आहे महत्त्वाचं? जाणून घ्या !

बाहेरुन आलात? हात धूतले का? आज आम्ही हा प्रश्न विचारतोय कारण 15 ऑक्टोबर हा दिवस ग्लोबल हँडवॉशिंग डे (Global Handwashing Day) म्हणून साजरा केला जातो. कोरोना (Corona) संकटात तर हातांची स्वच्छता राखणं अतिशय महत्वाचं आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 15 ऑक्टोबर: लहानपणी बाहेरुन आल्यावर घरातली मोठी माणसं आपल्याला नेहमी सांगायची की "हात -पाय स्वच्छ धुवून घे." आज आम्ही तुम्हाला याची आठवण करुन देत आहोत कारण, 15 ऑक्टोबर हा दिवस ग्लोबल हँडवॉशिंग डे (Global Handwashing Day) म्हणून साजरा केला जातो. हातांची स्वच्छता उत्तम आरोग्य राखण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. हात स्वच्छ धूत राहिल्यामुळे अनेक रोगांपासून आपण दूर राहू शकतो. कोरोनाच्या काळात डॉक्टरांनीच सतत हात धूत राहण्याचा सल्ला दिलेला आहे. हातांनी आपण अनेक वस्तूंना स्पर्श करत असतो. त्यामुळे हातांना अनेक धुलिकण लागत असतात. जे आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. पण त्यातूनच रोगाचा प्रसार होतो. हातांची स्वच्छता राखण्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आजचा हा दिवस 'ग्लोबल हँडवॉशिंग डे' म्हणून मानला जातो. स्वीडनमध्ये 2008 सालापासून 'ग्लोबल हँडवॉशिंग डे'ची सुरुवात झाली. दरवर्षी वेगवेगळी 'थीम'ही ठेवली जाते. हात साबणाने स्वच्छ धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. या दिवसानिमित्त, हातांमुळे पसरणारे रोग आणि हातांची स्वच्छता कशी राखावी याबाबत जनजागृती केली जाते. 'ग्लोबल हँडवॉशिंग डे' निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यंदाची थीम कोणती? 'सर्वांसाठी स्वच्छ हात' (Clean Hands For All) अशी थीम यंदा ठेवण्यात आलेली आहे. सध्या संपूर्ण जग कोरोना (Corona)च्या विळख्यात अडकलेलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता, तसंच सतत हात धूत राहण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलं आहे. सध्या कोरोनावर अद्याप कोणतीही लस विकसित झालेली नाही. त्यामुळे सध्या स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे.
First published:

Tags: Corona, Lifestyle

पुढील बातम्या