कॅनबेरा, 28 जानेवारी : काचबिंदू हा डोळ्यांचा आजार, ज्याचं प्रमाण जास्त झाल्यास अंधत्वही ओढावतं. काचबिंदू पूर्णपणे बरा होत नाही, मात्र उपचारांनी तो आटोक्यात ठेवता येऊ शकतो, यासाठी त्याचं वेळीच निदान होणं गरजेचं आहे. काचबिंदूचं लवकर निदान व्हावं यासाठी संशोधकांनी अशी चाचणी विकसित आहे, ज्यामुळे काचबिंदूचं निदान सुरुवातीच्या टप्प्यातच होईल आणि त्यावर योग्य ते उपचार करून अंधत्वाचा धोका टाळता येईल. नेचर जेनेटिक्स जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
काय आहे हे संशोधन?
ऑस्ट्रेलियाच्या फिलिनडर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी १०७ जिन्स सापडलेत, जे काचबिंदू होण्यासाठी कारणीभूत ठरतात
संशोधकांनी एक अशी जेनेटिक टेस्ट (आनुवंशिक चाचणी) तयार केली आहे, जी काचबिंदू विकसित होण्याच्या सुरुवातीलाच त्याचं निदान करू शकेल.
या चाचणीत रक्त किंवा लाळेच्या नमुन्यांद्वारे या आजाराचं निदान होऊ शकतं.
संशोधकांनी सांगितल्यानुसार, या चाचणीला मान्यता मिळाल्यास डॉक्टरांना मोतीबिंदूचं निदान करणं सोपं होईल. शिवाय रुग्णांच्या डोळ्यांना पोहोचणारी हानी रोखण्यातही मदत मिळेल.
काचबिंदू म्हणजे काय?
डोळ्यांच्या आतील द्रवाच्या अभिसरणात अडथळा येतो, त्यामुळे डोळ्यांवरील दाब वाढतो
काचबिंदूचं निदान लवकर होत नाही, वेळेत उपचार न झाल्याने अंधत्व ओढावतं
काचबिंदू कुणालाही होऊ शकतो, मात्र आनुवंशिकतेने जास्त होत असल्याचं दिसून आलं आहे.
अन्य बातम्या
Low cholesterol ही शरीरासाठी घातकच, 'या' अवयवावर होईल परिणाम
तुम्ही झुरळांपासून तयार केलेलं औषध तर पित नाहीत ना? तात्काळ तपासा औषधाची बाटली मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.