Home /News /lifestyle /

हे अद्याक्षर असणाऱ्या नावाच्या मुली कधीच सोडत नाही पतीची साथ, या यादीत आहे का तुमचं नाव?

हे अद्याक्षर असणाऱ्या नावाच्या मुली कधीच सोडत नाही पतीची साथ, या यादीत आहे का तुमचं नाव?

नावात काय आहे? असं म्हटलं जातं. पण ज्योतिषशास्त्रात (astrology) एखाद्या व्यक्तीच्या नावाला किती महत्त्व दिलं जातं याबाबत तुम्हाला माहित आहे का? व्यक्तीच्या नावावरून सुद्धा त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो!

मुंबई, 13 फेब्रुवारी: नावात काय आहे? असं म्हटलं जातं. पण ज्योतिषशास्त्रात (astrology) एखाद्या व्यक्तीच्या नावाला किती महत्त्व दिलं जातं याबाबत तुम्हाला माहित आहे का? व्यक्तीच्या नावावरून सुद्धा त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो! एखाद्या मुलीचं नाव कोणत्या अक्षराने सुरू झालं आहे, त्यावरूनही ती मुलगी तिच्या नवऱ्याला एखाद्या गोष्टीत सपोर्ट करेल का नाही, हे सांगता येतं. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक अक्षर काही ना काही सांगत असतं. नावाच्या पहिल्या अक्षरावरून कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल बरेच काही जाणून घेता येतं. आज तुम्हाला आम्ही अशा काही अक्षरांबद्दल सांगणार आहोत, ज्या अक्षराने नावाची सुरुवात होणाऱ्या मुली खूप समजदार आणि हुशार असतात. ती मुलगी तिच्या पतीची ताकद मानली जाते. पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते.चला तर मग ही अक्षरं नेमकी कोणती आहेत, ते जाणून घेऊयात. - ज्या मुलींचे नाव 'A' अक्षराने सुरू होतं, त्या खूप मेहनती आणि सयंमी असतात. अशा मुली दिसायला आकर्षक असतात. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यात अद्भुत क्षमता असते. गर्दीतही त्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. 'A' अक्षराने नाव सुरू होणारी मुलगी नात्याला खूप महत्त्व देत असते. ती पतीवर खूप प्रेम करते, आणि करिअरमध्ये त्याला खूप साथ देते. हे वाचा-तुमचेही वारंवार आई-वडिलांसोबत वाद होतात का? संबंध सुधारण्यासाठी या आहेत 5 टिप्स - ज्या मुलींचे नाव 'F' अक्षराने सुरू होते, त्या खूप रोमँटिक असतात. त्यांच्यात खूप आत्मविश्वास असतो. विचार करून त्या पैसा खर्च करतात. त्या आयुष्यात प्रेमाला खूप महत्त्व देतात. 'F' अक्षराने नावाची सुरुवात होणारी मुलगी कधीच तिच्या पतीची साथ सोडत नाही. -ज्या मुलींचे नाव 'G' अक्षराने सुरू होतं, त्या खूप संयमी आणि हुशार असतात. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. त्या नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात. प्रेमाच्या बाबतीत अशा मुली खूप प्रामाणिक असतात. स्वतःच्या पतीची काळजी घेण्यासोबत त्याला अडचणीच्या काळात पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यास कोणतीही कसर 'G' अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली सोडत नाही. हे वाचा-तुमच्या Sun Sign नुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या 12ही राशींचं भविष्य - ज्या मुलींचे नाव 'B' अक्षराने सुरू होते, त्या खूप संवेदनशील असतात. अशा मुली पतीवर खूप प्रेम करतात, आणि स्वतःचे प्रेम उघडपणे व्यक्त करतात. ती तिच्या पार्टनरला आनंदी ठेवण्यासाठी नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करीत असते. पार्टनरला त्याच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी खूप मदत करते. ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या नावाला खूप महत्त्व आहे. अर्थात यावर कितपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (Disclaimer : हे वृतांकन सामान्य मान्यता आणि माहितीवर आधारित आहे. या गोष्टींचं lokmat.news18.com समर्थन करत नाहीत.)
First published:

Tags: Relationship, Relationship tips

पुढील बातम्या