मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लठ्ठ म्हणून बॉयफ्रेंडनं कुटुंबीयांशी ओळख करून देणं टाळलं; गर्लफ्रेंडनं असा घेतला बदला

लठ्ठ म्हणून बॉयफ्रेंडनं कुटुंबीयांशी ओळख करून देणं टाळलं; गर्लफ्रेंडनं असा घेतला बदला

गर्लफ्रेंड इतक्या वर्षांमध्ये जे करू शकली नाही, ते बॉयफ्रेंडचा बदला घेण्याच्या सुडानं तिनं केलं.

गर्लफ्रेंड इतक्या वर्षांमध्ये जे करू शकली नाही, ते बॉयफ्रेंडचा बदला घेण्याच्या सुडानं तिनं केलं.

गर्लफ्रेंड इतक्या वर्षांमध्ये जे करू शकली नाही, ते बॉयफ्रेंडचा बदला घेण्याच्या सुडानं तिनं केलं.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 07 डिसेंबर : आपली बायको किंवा गर्लफ्रेंड लठ्ठ (Obese) असेल तर कित्येक पुरुषांना, तरुणांना त्याची लाज वाटते. आपल्याला सडपातळ, स्लिम ट्रिम गर्लफ्रेंड, बायको हवी असंच स्वप्नं कित्येकांचं असतं आणि तशी जोडीदार मिळाली नाही तर मग तिला इतरांपासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न काही जण करतात. असाच प्रयत्न अमेरिकेतील एका तरुणानं केला आणि त्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडनं त्याचा बदलाही घेतला आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरात राहणारी 30 वर्षांची समांथा रॉली. कॅलिफोर्निया शहरातील ऑरेंज काऊंटीमध्ये ती राहते. ती सिंगल मदर आहे. तिचा एक बॉयफ्रेंडही होता. मात्र फक्त नावापुरता. म्हणजे त्यानं कधीच तिला आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटवलं नाही किंवा कुटुंबातल्या कोणत्या सदस्याला. समांथाला याचं कारणही समजत नव्हतं. एक दिवस तिनं त्याच्या सोशल मीडियावर एका मुलीसह त्याचा फोटो पाहिला आणि मग समांथाला मोठा धक्काच बसला. आपला बॉयफ्रेंड आपल्याला कुणाला का भेटवायचा नाही याचं कारण तिला समजलं आणि ते कारण म्हणजे तिचा लठ्ठपणा, तिचं वाढलेलं वजन. समांथाचं वजन 165 किलो होतं. समांथा म्हणाली, "मी त्याला दोन वर्षे डेट केलं होतं. त्यानं कधीच मला आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबाला भेटवलं नाही. माझा एक्स बॉयफ्रेंडआधीदेखील जितक्या लोकांना मी डेट केले, ते माझ्या वजनामुळे ते कम्फर्टेबल नव्हते. त्यामुळे माझा आत्मविश्वासही थोडा कमी झाला होता" हे वाचा -  बायको जोमात नवरा कोमात! 10 लाखांत नवऱ्याचा केला सौदा आपला बॉयफ्रेंड आपल्याला कुणाला का भेटवत नाही याचं कारण समजताच तिनं काहीही न सांगताच आपल्या बॉयफ्रेंडसोबत नातं तोडलं आणि त्यानंतर आपल्या वजनाला तिनं गांभीर्यानं घेतलं. तब्बल 90 किलो वजन तिनं कमी केलं आहे. फोटो सौजन्य - आज तक
फोटो सौजन्य - आज तक
"जेव्हा मी त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर एका मुलीसह त्याचा फोटो पाहिला तेव्हा माझ्यासाठी हे नातं संपलंच हे पक्कं झालं. त्यानं मला न सांगताच ब्रेकअप केलं होतं. त्याच्या अशा वागण्यामुळे मला दुःख तर झालंच मात्र या नात्यातून बाहेर पडल्यानंतर मी स्वतःवर लक्ष देऊ शकले आणि माझ्यासाठी हे खूप सकारात्मक होतं. मला लहानपणापासून वजनामुळे आत्मविश्वास कमी झालेल्यांना प्रेरणा द्यायची होती पण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना मी प्रेरणा देईन असं कधीच वाटलं नव्हतं. अशा लोकांशी नेहमी बोलण्याचा प्रयत्न करते, त्यांच्याशी माझा अनुभव शेअर करते आणि त्यांना प्रोत्साहित करते", असं समांथा म्हणाली. हे वाचा - लॉकडाऊनचा असाही एक फायदा; पती-पत्नींमधील दुरावा संपला समांथानं वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण पण काही फायदा झाला नाही. अखेर तिनं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. समांथानं ग्रॅस्टिक स्लीव्ह सर्जरी केली. आपल्या सोशल मीडियावरदेखील तिनं आपल्या वजन कमी करण्याबाबत माहिती दिली आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार बोर्ड पांडाशी बोलताना समांथानं सांगितलं की, "मी वयाच्या 12 व्या वर्षापासून डाएटिंग करते. वजन कमी करण्यासाठी मी औषधही घेतलं. याशिवाय बरेच उपाय करून पाहिले. काही कालावधीसाठी माझं वजन कमी व्हायचं पण पुन्हा वाढायचं. जास्त वजन अजूनही मला लठ्ठपणासंबंध समस्यांचा सामना करावा लागला नाही. पण तरी डेटिंगच्या जगात स्वतःला फिट ठेऊ शकत नव्हती. त्यामुळे स्वतःला फिट बनवण्याचा निर्णय घेतला"
First published:

Tags: Lifestyle, Relationship, Weight

पुढील बातम्या