फक्त एक कप कॉफीमुळे गर्लफ्रेंडला समजलं बॉयफ्रेंडचं 'लफडं'; कसं ते वाचा

दारू प्यायल्यानंतर लोक खरं बोलतात असं म्हटलं जातं. मात्र एका व्यक्तीचा खोटारडेपणा दारूमुळे नाही तर कॉफीमुळे समोर आला आहे. नेमकं काय घडलं पाहा.

दारू प्यायल्यानंतर लोक खरं बोलतात असं म्हटलं जातं. मात्र एका व्यक्तीचा खोटारडेपणा दारूमुळे नाही तर कॉफीमुळे समोर आला आहे. नेमकं काय घडलं पाहा.

  • Share this:
    वॉशिंग्टन, 15 डिसेंबर :कपड्यांवर लिपस्टिकचा डाग, मुलीचा केस, लेडीज परफ्युमचा वास असं काही दिसलं की आपल्या नवऱ्याचं (husband) किंवा बॉयफ्रेंडसह (boyfriend) दुसऱ्या कोणत्या तरी मुलीसोबत लफडं आहे या संशय येतो. पण एका कप कॉफीमुळे (coffee) पुरुषांचे अफेअर्स समोर आल्याचं कधी ऐकलं आहे का? दारू प्यायल्यानंतर व्यक्ती खरं बोलतो असं म्हटलं जातं. नशेत त्याची अनेक गुपितं खुली होतात. मात्र अमेरिकेतील एका व्यक्तीचे सिक्रेट दारूमुळे नव्हे तर कॉफीमुळे समोर आलं आहे. त्याच्या गर्लफ्रेंडला त्याच्या affair बाबत समजलं. अमेरिकेतील डॅनिअलनं ब्राऊनला फक्त एका कॉफी कपमुळे तिच्या बॉयफ्रेंडच्या लफड्याबाबत कळलं. आज तकच्या रिपोर्टनुसार डॅनिअलनं आपल्या टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं सर्व घटना सविस्तर सांगितली आहे. डॅनिअलनं सांगितलं, एक दिवस तिचा बॉयफ्रेंड घरी उशिरा आला. त्याच्या हातात एक कॉफी कप होता. उशीर का झाला म्हणून विचारलं असता त्यानं आपण काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. घरी परतताना आपल्याला कॉपी पिण्याची इच्छा झाली. मग कॉफी शॉपवर जाऊन कॉफी घेतली आणि तो घरी निघून आला. हे वाचा - फेरे घेताना भरकटला नवरा! नवरीनं भरमंडपातच मग काय केलं पाहा VIDEO बॉयफ्रेंडनं आपल्यासाठी कॉपी का नाही आणली याचं डेनिअलला थोडं आश्चर्यच वाटलं. तिनं याबाबत त्याला विचारलही. त्यानंतर तिनं थेट त्याच्या हातातील कप काढून घेतला आणि कॉफी पिऊ लागली. तेव्हा तिला अचानक त्या कपवर काहीतरी दिसलं. प्लॅस्टिक कपच्या मागच्या बाजूला काहीतरी लिहिलं असल्याचं तिला दिसून आलं. नीट पाहिल्यानंतर तिला दिसलं त्यावर ब्रिटनी असं लिहिलं होतं. ब्रिटनी ही डेनिअलच्या बॉयफ्रेंडची एक्स गर्लफ्रेंड होती. डेनिअलच्या बॉयफ्रेंडनं ज्या दुकानातून कॉफी घेतली होती तिथं कॉफी ऑर्डर करणाऱ्याचं नाव कॉफी कपवर लिहिलं जातं. मग काय ते नाव पाहूनच डेनिअलच्या मेंदूची ट्युब पेटली. ही कॉफी तिच्या बॉयफ्रेंडच्या एक्स गर्लफ्रेंडनं ऑर्डर केली होती. हे वाचा - ऐकावं ते नवलं! गाणं ऐकल्यानंतर गाय देते भरपूर दूध आणि शेतात येतं भरघोस पीक आपली मोठी फसवणूक झाली, बॉयफ्रेंड आपल्याशी खोटं बोलला हे डेनिअलला समजलं. तिनं लगेच तो कप आपल्या बॉयफ्रेंडला दाखवला आणि त्यावर ब्रिटनी असं का लिहिलं आहे, याचा जाब विचारला. तेव्हा तो म्हणाला, कॉफी सर्व्ह करणाऱ्यानं चुकीनं आपलंच नाव कपवर लिहिलं. आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या नावाची स्पेलिंग अशी नाही आहे. बॉयफ्रेंडकडून असं उत्तर मिळताच डेनिअलच्या रागाचा पारा चढला. तिनं तो कॉफी कप थेट बॉयफ्रेंडच्या तोंडावर फेकला आणि तिथून निघून गेली. यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published: