पास्ताची रेसिपी TikTokवर व्हायरल, VIDEO पाहून कंपनी म्हणाली...

पास्ताची रेसिपी TikTokवर व्हायरल, VIDEO पाहून कंपनी म्हणाली...

टिकटॉक व्हिडीओ (TikTok Viral Video) म्हणजे सध्या व्यसन झाले आहे.

  • Share this:

टिकटॉक व्हिडीओ (TikTok Viral Video) म्हणजे सध्या व्यसन झाले आहे. त्याचे गंभीर परिणामही वेळोवेळी लोकांना सहन करावे लागत आहेत. मात्र एका तरूणीला या TikTok Videoमुळे चक्क नोकरी गमवावी लागली आहे. खरतर TikTok Videoमध्ये ही तरूणी काम करत असलेल्या हॉटेलमध्ये कसे जेवण बनवले जात होते ते दाखवत होती.

या तरूणीनं TikTok Videoमध्ये प्रसिध्द पनेरा ब्रेड या हॉटेलचा पर्दाफाश केला आहे. या व्हिडीओमध्ये पनेरामध्य कसे चीझ टाकून मॅकरोनी पास्ता तयार केला जातो, हे दाखवण्यात आले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीनं तिला कामावरून काढून टाकले.

कामावरून काढल्यानंतर या तरूणीचा हा व्हिडीओ उबरनं ट्विटरवर टाकला. यावर, “या व्हिडीओमुळं मला माझी नोकरी गमवावी लागली”, असे ब्रियाना रामिरेझनं ट्वीट करत सांगितले.

या 8 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ब्रियाना पनेरा कंपनीच्या किचनमध्ये उभी राहून मॅकरोनी पास्ता कसा बनवतात हे दाखवत होती. तिनं एक फ्रोझन बॅग घेऊन उकळत्या पाण्यात टाकली आणि अगदी काही सेकंदात पास्ता तयार झाला.

ब्रियानानं झटपट तयार झालेला पास्ता म्हणून हा TikTok Video तयार केला होता. मात्र यानंतर लोकांनी कंपनीवर टीका करण्यास सुरुवात केली. एका युझरनं यावर, “मी एकदा पास्ता खाल्ला होता. मात्र त्यानंतर माझ्या गळ्यात प्लॅस्टिकचा तुकडा अटकला”, असे लिहिले.

दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर ब्रियानानं न्यूज चॅनलनं हा व्हिडीओ दाखवल्यामुळं तिला नोकरी गमवावी लागली, असे सांगितले.

VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2019 02:13 PM IST

ताज्या बातम्या