मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आई शपथ! साडी नेसून मारला जिमनॅस्टिकचा फ्लिप, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

आई शपथ! साडी नेसून मारला जिमनॅस्टिकचा फ्लिप, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

हा व्हिडीओ अर्पना जैन नावाच्या महिलेने तिच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

हा व्हिडीओ अर्पना जैन नावाच्या महिलेने तिच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

हा व्हिडीओ अर्पना जैन नावाच्या महिलेने तिच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

    नवी दिल्ली, 08 जानेवारी : पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेचा साज देत तरुणी आता साडीमध्येच तरुणी वेगवेगळ्या स्टंट, डान्स, जिमनॅस्ट करत असल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. या तरुणींचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणीनं साडीत रिंगसोबत भन्नाट डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता साडीमध्ये फ्लिप म्हणजेच गोलांटी उडी मारत असलेल्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: तुफान व्हायरल होत आहे.

    साडी नेसून ही तरुणी धावत येते आणि थेट गोलांटी उडी मारते. तरुणीनं साडी खूपच सुंदर पद्धतीनं नेसली आहे आणि गोलांटी उडी घेताना देखील अगदी सहजपणे ती साडी सांभाळून हे करत आहे. हा व्हिडीओ अर्पना जैन नावाच्या महिलेने तिच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 184.3 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 7 जानेवारीला हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला होता त्यानंतर आतापर्यंत अडीच हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट आणि कमेंट्स केल्या आहेत.

    या तरुणीचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. एका युझरनं तर ज्या महिला साडी नेसून ऑफिसमध्ये किंवा घरात काम करू शकत नाहीत त्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहायला हवा असंही म्हटलं आहे. तर दुसरा युझर म्हणतो साडीमध्ये इतक्या सुंदर पद्धतीनं फ्लिप मारण्यासाठी कौशल्य लागतं.

    जिमनॅस्टिकचे हा एक खेळ आहे. यामध्ये लवचिकता, कौशल्य आणि एकाग्रता लागते. शरीर मजबूत आणि लवचिक असणं या खेळासाठी आवश्यक असतं. जिमनॅस्टिकचे अनेक प्रकार आहेत. याशिवाय स्पर्धा देखील भरवली जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या स्पर्धा होत असतात.

    First published:

    Tags: Video viral