प्रियकरासोबत बिकिनीवर ती बीचवर फिरत होती, पोलिसांनी केलं असं काही की बसेल धक्का!

हॉटेलच्या स्टाफने याआधीच तिला सावध केलं होतं. लिनने जो स्विमसूट घातला तो बीचवर घालण्यास योग्य नसल्याचं स्टाफने सांगितलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 02:04 PM IST

प्रियकरासोबत बिकिनीवर ती बीचवर फिरत होती, पोलिसांनी केलं असं काही की बसेल धक्का!

फिलीपीन्समधील एका बीचवर तैवानमधील एका महिला पर्यटकाला अटक करण्यात आलं. या अटक करण्यामागचं कारण विचारले असता तिने बीचवर बिकिनी घातल्याचं पोलिसांनी सांगितलं. मेट्रोने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बोराके बेटावरील पुका बीचवर 26 वर्षीय लिन जू टिंग तिच्या प्रियकरासोबत फिलीपीन्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घ्यायला गेली होती. 9 ऑक्टोबरला बीचवर फिरताना तिने पांढऱ्या रंगाची स्ट्रिंग बिकीनी घातली होती. तिची बिकिनी पाहून लोकांनी बीचवरच गोंधळ करायला सुरुवात केली.

फिलीपीन्स न्यूज एजन्सीनुसार (PNA), लिन जू टिंगला हॉटेलच्या स्टाफने याआधीच सावध केलं होतं. लिनने जो स्विमसूट घातला तो बीचवर घालण्यास योग्य नसल्याचं स्टाफने सांगितलं होतं. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बोराे इण्टर- एजन्सी रिहेबिलीटेशन मॅनेजमेन्ट ग्रुपने (BIAMRG) पोलिसांना याबद्दल सांगितले.

BIAMRG चे अध्यक्ष नेटिविदाद बर्नार्डिनोने PNA ला सांगितलं की, हॉटेल मॅनेजमेन्टने तिला अशाप्रकारची बिकीनी घालण्यापासून परावृत्त केलं होतं. पण तिने ही एक कला असल्याचं सांगितलं. ती पुढे म्हणाली की, 'आमचे काही सांस्कृतिक मुल्य आहेत. ज्याचा मान ठेवला पाहिजे.'

बिकिनी घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी लिन जू टिंगला अटक करण्यात आली. पोलीस तिच्या हॉटेलवर पोहोचले आणि 10 ऑक्टोबरला अटक करण्यात आली. पोलीस अधिकारी जेस बेलॉन म्हणाले की, 'लिनवर कामुक आणि अश्लील फोटोंचं प्रदर्शन केल्याप्रकरणी 3 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पोलिसांनी हॉटेल मालकाला सर्व पर्यटकांना कायदे आणि नियम समजवण्याचे आदेश दिले आहेत. अटक केल्यानंतर लिनने स्वतःचा बचाव करत म्हटलं की, तिच्या देशात स्ट्रिंग बिकीनी घालणं ही फार सामान्य गोष्ट आहे.'

अपघातानंतर रस्त्यावर पडली होती महिला,तिच्यावरून गेली अजून एक गाडी; पाहा हा Video

Loading...

Boss Day: या 5 उपायांनी लगेच जाईल बॉसचा राग, एकदा वाचून पाहाच!

श्रीमंतांच्या यादीत Paytm चे मालक विजय शर्माचं नाव, पाहा Forbes India ची लिस्ट!

सोशल मीडियावर चर्चा फक्त या 50 वर्षांच्या आईचीच, पाहा का होतायेत तिचे PHOTO VIRAL

Facebook फाउंडर Mark Zuckerbergकडे आहे असं काही की तुम्ही हसू रोखू शकणार नाही!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...