नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : हिवाळ्यात (Winter) चहा पिणं कोणाला आवडत नाही? बाहेरची थंड हवा आणि हातात गरम चहाचा कप प्रत्येक माणसाचा मूड बदलतो. भारतीय लोकांमध्ये चहा पिण्याची विशेष आवड आहे. खेड्यांपासून शहरात राहणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे चहा प्यायला आवडतात. साध्या चहाव्यतिरिक्त, चहामध्ये चव वाढवण्यासाठी तुळस, आलं, वेलची, मसालं, लवंगा, मध, लिकोरिस, बडीशेप यांसारखे पदार्थदेखील मिसळले जातात. हिवाळ्यात आल्याचा चहा पिण्याचा आनंद वेगळाच असतो. थंडीच्या मोसमात आल्याचा चहा घशातून उतरला की सगळी सर्दी पळून जाते. MedicalNewsToday ने म्हटल्यानुसार आल्याचं सेवन आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. आलं खाल्ल्यानं सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. मात्र, आल्याचा चहा जास्त प्रमाणात प्यायल्यानं शरीराला हानी पोहोचते. आल्याचा चहा जास्त प्रमाणात प्यायल्यानं आरोग्याला कशी हानी पोहोचते (Ginger Tea Side Effects) ते जाणून घेऊ.
आल्याचा चहा जास्त प्रमाणात पिण्याचे दुष्परिणाम
आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. मात्र, याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते.
पोटाचा त्रास होऊ शकतो
जर तुम्ही आल्याच्या चहाचे जास्त सेवन करत असाल तर तुमची ही सवय सुधारण्याचा प्रयत्न करा. आल्याच्या चहाचं जास्त सेवन केल्यानं पोटाचे विकार होऊ शकतात. गॅसची समस्याही उद्भवू शकते. याच्या अतिसेवनाने शरीरात अस्वस्थतेची समस्याही निर्माण होऊ शकते.
हे वाचा - कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे शेअर बाजारालाही धक्के; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण
चक्कर येणं आणि अशक्तपणा
ज्या लोकांचा रक्तदाब कमी किंवा सामान्य आहे, त्यांनी आल्याचा चहा कमी प्यावा. आल्याचा चहा जास्त प्यायल्यानं या लोकांना चक्कर येणं आणि अशक्तपणा जाणवणं अशा समस्यांना सामोरे जावं लागू शकतं.
केस गळण्याची समस्या
आल्याचा चहा जास्त प्रमाणात घेतल्यास केस गळण्याची समस्या वाढते. आल्यामध्ये आढळणारा जिंजरॉल नावाचा घटक केसांच्या वाढीस प्रतिबंध करतो आणि याच्यामुळं केस गळतीही होऊ शकते.
हे वाचा - Expressive Art Therapy: एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपी म्हणजे काय? महिला का करत आहेत याचा जास्त वापर
अॅसिडिटी वाढते
आल्याचा चहा जास्त प्रमाणात प्यायल्यानं अॅसिडिटीची समस्या वाढू शकते. तसंच, यामुळं पोटात जळजळ होण्याची समस्याही होऊ शकते. आल्यामध्ये आढळणारे जिंजरॉल पोटात आम्ल तयार करते. अशा वेळी, आल्याच्या चहाचं सेवन कमी करावं.
झोपेचा त्रास
आल्याचा चहा जास्त प्रमाणात प्यायल्याने निद्रानाश होऊ शकतो. यामुळे शरीराला लवकर थकवा येऊ शकतो. अशक्तपणा देखील असू शकतो. त्यामुळे रात्री आल्याचा चहा पिणे टाळावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Winter, Winter session